माझा आवडता अभिनेता निबंध मराठी – Maza Avadta Abhineta Nibandh Marathi

आपल्या सिनेसृष्टीत अनेक नामवंत अभिनेते होऊन गेले, आजही आहेत. जसे जितेंद्र, धर्मेंद्र, दिलीपकुमार, सारखे अभिनेते व हेमामालिनी, रेखा, मधूबाला सारख्या अभिनेत्री प्रत्येकजण आपल्यातील विशिष्ट खुबीने आणि अदाकारीने प्रसिद्ध झाले. त्यांनी कितीतरी पारितोषिके, बक्षिसे मिळविली पण लहानपणापासुन मला आवडलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन.

त्याचा अभिनय प्रत्येक वयाच्या प्रेक्षकांना गुंग करणारा आहे. समोरच्याला जागेवरच खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्याच्या संवादात व अभिनयात आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात स्टंट दृष्य गाजलेले दिसते मग तो स्टंट व्हिलनबरोबर असो वा शार्क माशासोबत. मोठ्या बजेटचे चित्रपट व त्यासाठीचा करार करण्यासाठी निर्माते त्याला विनंती करत असतात. तर दिग्दर्शक व निर्माते त्याच्या अवतीभवती घोटाळत असतात. मला अमिताभच्या अभिनयाची ओळख पटली ते ‘दिवार’ या चित्रपटाने त्यात तो गरीब कर्मचारी आहे पण गरीबांचा वाली आहे. धनिकांना योग्य तो धडा शिकवून गरीबांना योग्य न्याय मिळवून देणाऱ्यांचा तो प्रतिनिधी आहे. असा ‘गरीबांचा वाली आणि धनिकांचा कर्दनकाळ’ प्रत्येक तरुण मनाचा रोल मॉडेल असतो. डाकूच्या टोळीला पळवून लावुन गावातील स्त्रिया बालके व वृद्धांना दिलासा देणारे त्याचे व्यक्तिमत्व लोकांना विशेष भावते त्यामुळे अमिताभचा प्रत्येक सिनेमा दहाव्या वेळीही पाहताना उत्साहाने प्रेक्षक त्याच्या कलेची दाद देतात. आणि एकच चित्रपट अनेक वेळा पहाण्याचा उच्चांक गाठतात.

प्रत्येक चित्रपटात त्याची भूमिका गरीब, लावारिस तरुणाची असते व सत्यासाठी लढणाऱ्या युवकाची असते त्यामुळे आपल्या मनातील कलाकार व त्याचा अभिनय आपण त्याच्यातुनच साकारुन घेत असतो जणू काही ती भूमिका आपणच जगत असतो.

एखाद्या चित्रपटात तो लावारिस म्हणजे अनाथ असतो कधी कुली असतो गरीबांची बाजू घेऊन अन्यायाविरुद्ध लढा देणारा (अँग्री यंग मॅन) असतो प्रसंगी पोलिसांचा मार, तुरुंगाची हवा खातो पण गरीबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असतो. आपल्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून देतो. आपल्या चाहत्यांना तो कधीही नाराज करत नाही. त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी ‘प्रतिक्षा’ भोवती जमलेल्या चाहत्यांना हात करुन शुभेच्छांचा स्वीकार करतो पण एखादा आगावू पत्रकार त्याच्या खाजगी जीवनात उगीचच ढवळाढवळ करु लागला तर त्याला योग्य प्रकारे फटकारतो.

ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांत तो हिरीरीने भाग घेतो. धर्मादायी संस्थांना योग्य ती मदत करुन आपल्या दानशूरपणाचेही दर्शन करवतो. मुलांच्या बक्षीस वाटपाच्या कार्यक्रमात तो विशेष सहभागी होतो. राजकारणात विशेष यश न मिळाल्यामुळे चार हात दूर राहून राजकारणी लोकांशी संबंध टिकवून आहे. आपल्या खाजगी जीवनातही तो तितकाच सज्जन व सोज्वळ आहे. आपल्या पत्नी व मुलांना आपल्या मूल्यवान वेळेचा हिस्सा देत असतो. पत्नी जया व मुलगा अभिषेक यांच्याशी खेळकरपणाने तो त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करत असतो. सत्तरीनंतरही चिरतरुण वाटतो तरुण व वृद्ध

असा हा माझा आवडता अभिनेता दोन्ही भूमिका आजही तो तितक्याच तन्मयतेने निभावून नेतो.

माझा आवडता अभिनेता निबंध मराठी – Maza Avadta Abhineta Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply