महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी

ज्यावेळी नदीला मोठा महापूर येतो, त्यावेळी मोठमोठाली झाडे त्यांच्या ताठरपणामुळे उन्मळून पडतात, वाहून जातात; पण लव्हाळे लवचिक असल्यामुळे महापुराच्या वेळी खाली वाकते. पुराचे पाणी त्याच्यावरून जाऊन लव्हाळ्याचा जीव वाचतो. असे या उक्तीतून संत तुकारामांना सुचवायचे आहे.

माणसाने नेहमी नम्र असावे. नम्रता हा अनेक चांगल्या गुणांपैकी एक श्रेष्ठ गुण आहे. नम्रतेमुळे माणसे जोडली जातात. नम्रता, विनयशीलता या गुणांमुळे अनेक कार्ये तडीस जातात. माणसाला जीवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी परिश्रमाच्या जोडीला नम्रता असावी लागते; पण याउलट माणसाच्या उद्धट स्वभावामुळे त्याच्यावर अनेक संकटे येतात. कोणतेही कार्य पूर्णत्वाला जाण्यास अनेक अडचणी येतात. माणसाच्या गर्विष्ठपणामुळे आणि उद्धट वागण्यामुळे त्याच्यावर सर्वनाशही ओढवतो.

फार पूर्वी देव आणि राक्षस यांच्यात नेहमी युद्धे व्हायची. नम्रता आणि विनयशीलतेमुळे देवांचा नेहमी विजय व्हायचा; तर उद्धटपणा, उर्मटपणा, गर्विष्ठपणा यामुळे राक्षसांना नेहमी पराभव पत्करावा लागायचा. कंस, रावण, दुर्योधन हे बलवान असूनही केवळ अंगी असणाऱ्या दुर्गुणांमुळे त्यांचा सर्वनाश झाला.

पुढे वाचा:

Leave a Reply