महापूर निबंध मराठी – Mahapur Nibandh Marathi

पावसाळा ऋतू हा शेतकऱ्याला वरदान ठरणारा ऋतू आहे. सारी सृष्टी हिरवीगार होते. डोंगरदऱ्यातून झरे वाहतात. शेतात पिके डोलू लागतात. सारे काही आनंदमय वातावरण असते, पण अशातच पावसाने अचानक आपले रूप बदलून रूद्रावतार धारण केला, तर मात्र लवकरच भीषण संकट येणार असल्याची चाहूल सर्वांनाच लागते. .

पावसाचे प्रमाण अचानक वाढले म्हणजे संततधार मुसळधार पाऊस सुरू झाला की हमखास महापूर येतोच. भूकंप, दुष्काळ, त्सुनामी, आग, दंगल याप्रमाणेच भयानक आणि प्रलयकारी रूप घेणारी आपत्ती म्हणजे महापूर. महापुरामुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते.

महाराष्ट्रात २६ जुलै २००५ रोजी महापुराने महाप्रलय घडवून आणला. मुंबईत हाहाकार उडाला. कित्येक चौरसमीटर भूभाग पाण्याखाली गेला.

गल्लीबोळातून पाणी शिरून अनेक लोक मृत्युमुखी पडले. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी दरड कोसळून कित्येक लोक जमिनीखाली गाडले गेले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तर शेतकऱ्यांची दैन्यावस्था झाली. नदयांचे पाणी पात्राबाहेर पडले आणि ते आजूबाजूच्या शेतवडीत शिरले. कित्येक दिवस पिके पाण्याखाली राहिल्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले.

सारा महाराष्ट्र पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी धावला. पण प्रयत्न अपुरे पडत होते. उखडलेले रस्ते आणि जागोजागी रस्त्यावर आलेले महापुराचे पाणी यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. घरांची पडझड झाली होती. कित्येक जनावरे बुडून मेली. २६ जुलैचा महापूर महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असे रूद्र स्वरूप धारण करून तो आला होता.

महापूर निबंध मराठी – Mahapur Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply