Set 1: माझा आवडता नेता लोकमान्य टिळक निबंध मराठी – Maza Avadta Neta Lokmanya Tilak Nibandh Marathi

आपल्या देशात अनेक थोर नेते होऊन गेले. ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचे आपण ऋणी आहोत. त्या सर्वांपैकी लोकमान्य टिळकांचे कार्य मला अधिक प्रभावित करते.

लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होय. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली, या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांना लोक बाळ असे म्हणत त्यांचे नाव केशव असे होते. बालपणापासून ते कडक स्वभावाचे व स्पष्टवक्ते होते. त्यांनी बी.ए.एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेतले. उत्तम आरोग्यासाठी ते नियमित व्यायाम करत असत. त्यांनी पुण्याला ‘न्यु इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली. त्यांनी ‘मराठा’ व ‘केसरी’ ही वृत्तपत्रे तसेच गणेशोत्सव आणि शिवजयंती हे राष्ट्रीय उत्सव सुरु केले. परखड स्वभावामुळे जहालमतवादी म्हणूनच ते प्रसिध्द होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत व आईचे नाव पार्वतीबाई होते.

लो. टिळक अनेकदा तुरूंगात गेले. त्यांनी तरूंगातही आपले काम बंद केले नाही. तुरूंगात त्यांनी ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ लिहिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते नेहमी झगडत राहिले. ते अन्यायाच्या विरूद्ध झगडले. ते त्यांच्या गुरुजनांचा खूप आदर करत. ते शाळेत खूप हुशार होते.

जेव्हा ते मरण पावले तेव्हा पूर्ण भारताला मोठा झटका लागला. या थोर नेत्याचे १ ऑगस्ट १९२० रोजी देहावसान झाले. अशा या थोर नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम.

Set 2: माझा आवडता नेता डॉ बाबासाहेब आंबेडकरां निबंध मराठी – Maza Avadta Neta Dr Babasaheb Ambedkar Nibandh Marathi

भारत इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा आपण सगळे गुलामगिरीत होतो. या गुलामांचे जीवन दुःखदायक होते. तेव्हा आपल्याला सुखी व स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी प्रयत्न केले आणि अनेक क्रांतिकारक होऊन गेले.

अशा थोर नेत्यांमध्ये म. गांधी, लोकमान्य टिळक, आगरकर, आंबेडकर होऊन गेले. या सर्वांचेच कार्य कौतुकास्पद आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वांपुढे आजही दिसून येते. अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेले बाबासाहेब हे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार बनले.

अभ्यासाची सोय नव्हती म्हणून ते रस्त्याच्या कडेच्या दिव्याखाली बसून रात्रभर अभ्यास करीत. शाळेतही अस्पृश्य म्हणून दूर बसविले गेले, तरीही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलेच. ते परदेशात शिकायला गेले आणि बॅरिस्टर झाले. त्यांनी दलितांसाठी अनेक सुखसोई मिळवून दिल्या. दलित लोकांसाठी महाडच्या चवदार तळ्याचा संघर्षही केला. तेव्हा त्यांना जखमाही झाल्या. पण ते डगमगले नाहीत. आणि तेच दलितांचे कैवारी ठरले.

म्हणूनच मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवडतात.

माझा आवडता नेता निबंध मराठी – Maza Avadta Neta Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply