Set 1: माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Chimni in Marathi

चिमणी हा माझा आवडता पक्षी आहे. चिमणी सर्वत्र आढळते. मी जिथे जातो, तिथे चिमणी मला दिसतेच. तिचे निरीक्षण करताना मला खूप आनंद मिळतो.

चिमणी हा अगदी छोटासा पक्षी आहे. चिमणीचा रंग करडा असतो. इवल्याशा चोचीने ती पटपट दाणे टिपते. तिचे पंख इवलेसे व पायही इवलेसे असतात. ती एक-एक पाय टाकत कधी चालत नाही. ती टुणटुण उड्या मारत चालते.

चिमणी एका जागी स्वस्थ कधी दिसतच नाही. ती त्वरेने हालचाली करते. कसलीही चाहूल लागली की, ती भुर्रकन उडते. लहान मुलांना चिमणी खूप आवडते. अनेकदा आरशातील स्वत:च्याच प्रतिबिंबाशी ती भांडते. ते दृश्य खूप मजेदार असते. कधी कधी चिमण्या घरात शिरतात. मग त्यांच्या चिवचिव आवाजाने घर भरून जाते.

चिमणीमुळे कसलाही उपद्रव होत नाही. तिच्यामुळे आनंद मात्र खूप मिळतो.

Set 2: माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Chimni in Marathi

चिमणी अगदी लहानपणापासूनच आपल्या ओळखीचा असते. लहानपणी आई घास भरवताना ‘ हा घास चिऊचा’ असे सांगून आपल्याला वरणभात भरवते. चिऊकाऊच्या गोष्टीत चिमणी असतेच.

चिमणी हा अगदी मुठीएवढा चिमुकला पक्षी आहे. ती रंगाने मातकट करडी असते. सतत चिवचिव असा आवाज करते. चिमणी ही मनुष्य वस्तीच्या जवळच राहाते. तिची घरटीही ती माणसांच्या घराच्या वळचणीला बांधते. त्यामुळे साप आणि कावळ्यांपासून तिला पिलांचे रक्षण करता येते. कापूस, नारळाच्या करवंटीचे केस आणि गवत वापरून ती आपले घर अगदी सुबक बांधते. आकाराने लहान असल्यामुळे ती बेधडकपणे माणसांच्या घरात घुसते. परंतु हल्लीच्या आधुनिक फ्लॅटपद्धतीमुळे चिमण्यांना माणसांच्या घरात घरटे बांधणे कठीण झाले आहे.

चिमण्याच्या मानेभोवती काळा पट्टा असतो त्यामुळे चिमणा हा चिमणीपेक्षा वेगळा ओळखून येतो.

हल्ली मोबाईल टॉवरमुळेही चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे असे म्हणतात. चिमणी धान्य, किडामुंगी सगळे काही खाते. एके काळी पहाट झाली की झाडांवर झोपलेल्या चिमण्या जाग्या होऊन प्रचंड कलकलाट करायच्या तेव्हा त्या झाडावर चिमण्या आहेत तरी किती असा प्रश्न लोकांना पडत असे. अशी ही चिमणी मला खूप आवडते.

Set 3: माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Chimni in Marathi

चिऊताई म्हटले की आठवते इवलीशी चिमणी. चिमणी एक लहानसा पक्षी आहे. चिमणी घरट्यात रहाते. तिचे घरटे ती झाडावर, घरात, माळ्यावर बांधते. ती आपल्या घराच्या आसपासच वावरते. ती शेतात व इकडे तिकडे धान्य खाते. ती खूप भित्री असते. ती भुर्रकन उडून जाते.

बदक हा पाळीव प्राणी आहे. बदक पाण्यात राहते. ते तळ्यात व नदीतीरी आढळते. बदक पांढऱ्या रंगाचे असते. बदक कोंबडीप्रमाणे अंडी घालते. बदकाला पोहता येते. बदक जमिनीवरही चालते. बदकाला उडताही येते. बदक पाण्यातील किडे व मासे खाते. लहान मुलांना बदक खूप आवडते.

माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Chimni in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply