महाराष्ट्रातील अभयारण्ये मराठी निबंध
माणसाने स्वत:च्या सुखासाठी वारेमाप जंगलतोड केली आहे. त्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे अनेक प्राणी नष्ट होत आहेत. शिकारीच्या हव्यासामुळेही प्राणी मारले जात आहेत. यामुळे निसर्गाचा समतोल नाहीसा झाला आहे. या कारणाने माणसावरच मोठे संकट आले आहे, याची माणसाला आता जाणीव झाली आहे. जगभर आता प्राण्यांसाठी अभयारण्ये निर्माण केली जात आहेत प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारनेही अनेक अभयारण्ये निर्माण केली आहेत. रायगड जिल्हयात कर्नाळा येथे आणि नाशिक जिल्ह्यात नांदूर-मधमेश्वर येथे पक्ष्यांसाठी अभयारण्ये आहेत. सोलापूर जिल्हयातील नान्नज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य उभारले आहे, तर बीडमधील नायगाव येथे मोरांना अभय दिलेले आहे.
अहमदनगरमधील रेहेकुरी येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे. कोल्हापूरमधील राधानगरी येथे गव्यांना आश्रय दिला आहे. या सर्व ठिकाणी प्राण्यांना मारण्यास बंदी आहे. प्राण्यांची हत्या करण्याचा क्रूर आनंद घेणारे लोक तरीही प्राण्यांना मारतात. हे तत्काळ थांबले पाहिजे, तरच माणूस जिवंत राहील.
पुढे वाचा:
- महापूर निबंध मराठी
- महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी
- महापुरुषांचे मोठेपण निबंध मराठी
- महात्मा बसवेश्वर निबंध मराठी
- महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी
- महागाई एक समस्या मराठी निबंध
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध