माझा आवडता सण विजया दशमी निबंध – Maza Avadta San Vijayadashami Dasara
विजया दशमी म्हणजे दसरा, गणेश चतुर्थी नंतर येणारा मोठा सण म्हणजे दसरा. हा सण दहा दिवस चालतो. म्हणून या सणाला दसरा असे म्हणतात. दसरा हा सण आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व आश्विन शुद्ध दशमीला संपतो.
दसरा या सणाला प्राचीन परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी रावणाचा वध विजयादशमी दिवशी केला. पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर त्यांनी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवलेली शस्त्रे बाहेर काढली तो हाच दिवस. याच दिवशी पांडवांनी लपवून ठेवलेल्या शस्त्रांची पूजा केली. आजही दसऱ्यात शस्त्रपूजा केली जाते.
दसऱ्याच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना असे म्हणतात. घटस्थापनेपासून दसरा उत्सवाला सुरूवात होते. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रोज देवाचा जागर केला जातो. दसऱ्याचे दांडियानृत्य तर खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. शाळेतील मुले या दिवशी नवी कपडे घालून सरस्वतीची पूजा करतात. गुरुवर्यांकडून आशीर्वाद घेतात.
सीमोल्लंघन हा दसऱ्याच्या सणातील सर्वांत आनंदाचा क्षण. सीमोल्लंघनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वजण एकमेकांना शमीच्या वृक्षाची पाने देऊन म्हणजे सोने देऊन सोने घ्या सोन्यासारखं राहा’ अशी शुभेच्छा देतात.
पुढे वाचा:
- माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध
- माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी
- माझा आवडता विषय मराठी निबंध
- माझा आवडता विषय इतिहास
- माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी कोकिळा निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी
- माझा आवडता नेता निबंध मराठी
- माझा आवडता थोर समाजसुधारक मराठी निबंध
- माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी
- माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी
- माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध