Set 1: माझा आवडता सण निबंध मराठी – Maza Avadta San Essay in Marathi

आपल्या भारतात सणवार अगदी खूपच आहेत. वर्षभर काही ना काही सण नाहीतर उत्सव चालूच असतो असे म्हणायल हरकत नाही. मकरसंक्रांत, गुढीपाडवा, होळी, महाशिवरात्र, रामनवमी, राखीपौर्णिमा, कृष्णाष्टमी, गणेशोत्सव, दुर्गापूजा दसरा, दिवाळी असे अनेक सण आपण करीत असतो. तसे मला सर्वच सण आवडतात कारण तेव्हा शाळेला सुट्टी असते. आई घरी गोडधोड पक्वान्ने बनवते. नातेवाईकांना भेटायला मिळते. तरीही मला सर्वात आवडणारा सण कुठला असेल तर तो म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण म्हणजे सगळ्या सणांचा राजाच आहे असे मला वाटते.

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. हा सण दिव्यांचा आहे, प्रकाशाचा आहे म्हणून त्याला दीपावली असे नाव पडले. सुगीचा हंगाम झाल्यावर पीक घरात येते. शेतकरीराजा आनंदाने हसू लागतो. त्याच्या कष्टाचे मोल धरतीमाईने भरपूर दिले असते. अशा वेळेस दिवाळी सण येतो.

सा-या भारतात हा सण साजरा केला जातो. ह्या सणाची व्याप्ती वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी सहा दिवसांची असते. आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील द्वादशीला म्हणजे बाराव्या दिवशी वसुबारस साजरी करतात. गायवासराचे आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठे योगदान आहे.

Set 2: माझा आवडता सण निबंध मराठी – Maza Avadta San Essay in Marathi

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटच्या आठवड्यात घरोघरी खमंग वासाची मेजवानीच मिळते. लाडू, करंज्या, कडबोळी, चकली यांचा घमघमीत वास घराघरात दरवळत असतो. गृहिणी आपली इतर कामे बाजूला सारुन दिवाळीतील तोट्यांच्या व ॲटमबाँबच्या रोषणाईने दिवाळीची रात्र साजरी करतात. घरांघरात पहाटेपासून अभ्यंग स्नानास सुरुवात होते.

आपल्या देशात अनेक सण मोठ्या उल्हासाने व जोशाने साजरे केले जातात जसे दिवाळी, रमजान ईद, गुढीपाडवा, नाताळ व नवरोज. प्रत्येक सणाची वेगवेगळी महती आणि पद्धत आहे परंतु उद्देश व हेतू निखळ आनंद मिळविणे आणि एकमेकांच्या भेटी घेणे हाच असतो. मला मात्र निर्हेतुक आनंद देणारा दिवाळी सण आवडतो. दिवाळी दिवशी आम्ही भल्या पहाटे उठतो. आमची आई आम्हाला सुगंधी उटणे लावून स्नान घालते. नंतर वेणी घालून नवीन शिवलेली कपडे घालून फटाके उडविण्यास, फुलबाजे फुलविण्यास बाहेर येतो. शेजारचे मित्रमंडळी नवीन कपडे घालून सर्वात मिसळतात. सात-आठ वाजेपर्यंत सगळीकडून फटाक्याचे द्वंद्व सुरु असते. नंतर आम्ही सर्वजण फराळाचा आस्वाद घेतो. गप्पागोष्टी करीत लाडू, चिवडा, कसा संपला हेही समजत नाही.

दिवाळीचा दुसरा दिवस लक्ष्मीपुजनाचा असतो. गृहिणी लक्ष्मीपुजनात मग्न असतात. घरोघरी लक्ष्मीच्या तसबीरीला हार हळदीकुंकवाने पवित्रता आणली जाते. तिसरा दिवस हिंदू धर्मात पाडवा व नवीन वर्षदिन म्हणून साजरा केला जातो यात पत्नी आपल्या पतीला प्रेमाने ओवाळतात. भाऊबीजेचा दिवस दिवाळी सणाचा महत्त्वाचा मानतात. या दिवशी भाऊबहिणीची अतुट नाती अधिक दृढ होतात. बहिण भावाला प्रेमाने ओवाळून, देवा जवळ भावासाठी औक्षण मागते. पेढ्याच्या, लाडूच्या घासाने भावाचे तोंड गोड करते. भाऊदेखील स्वकमाईतील छोटीशी ओवाळणी घालून बहिणीला खुश करतो. लहानथोर मंडळी फटाके उडवून आपला आनंद व्यक्त करीत असतात. शाळांना महिनाभर सुट्टी असल्याने मुलेही अभ्यासाचा ताण विसरुन या सणाची मजा लुटत असतात.

माझा आवडता सण निबंध मराठी – Maza Avadta San Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply