माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी – Maza Avadta San Ganesh Utsav Marathi Nibandh

हिंदू धर्मात वैदिक काळापासून गणपतीला फार मानाचे स्थान आहे. कोणत्याही कार्याची सुरूवात गणेशाच्या पूजेने होते. म्हणूनच श्रीगणेशा करणे म्हणजे कोणत्याही कार्याची सुरूवात करणे असे म्हटले जाते. भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र म्हणजे विघ्नहर्ता. श्रीगणपती हे भारतीय संस्कृतीतील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच गौरीगणपती सणाला भारतात फार महत्त्व आहे.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचे मोठ्या थाटामाटात आगमन होते. पहिल्याच दिवशी यथाविधि पूजा करून ‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही मंगल आरती म्हटली जाते, खीर, मोदकांचा नैवद्य दाखवला जातो. या काळात गणपतीची रोज नित्यनेमाने आरती केली केली जाते. तीन-चार दिवसांनी गौराई गणपतीच्या घरी मुक्कामाला येते. पुढच्याच दिवशी भगवान शंकर गणपती आणि गौराईला नेण्यासाठी मुक्कामी येतात. नंतर दुसऱ्या दिवशी घरगुती गणपतीचे विसर्जन होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणोशोत्सव सुरू केला. सार्वजनिक गणेशाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होते. गौरी-गणपतीच्या काळात सार्वजनिक गणेशाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला मोठ्या धुमधडाक्यात होते. गौरी-गणपतीच्या काळात सार्वजनिक मंडळे अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वच लोक गणेशोत्सवात रममाण होऊन जातात. सुशोभन आरास, रंगरंगोटी यावर लोक खूप पैस खर्च करतात. भारताच्या बाहेरही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. त्यामुळे या सणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी – Maza Avadta San Ganesh Utsav Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply