माझा आवडता पक्षी कोकिळा निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Kokila Nibandh Marathi
आपण लहान असतो तेव्हापासूनच आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख होते. त्या पक्ष्यांमध्ये कावळा, चिमणी, कबुतर, कोंबडा असे अनेक पक्षी असतात.मला मात्र कोकिळा हा पक्षी खूप आवडतो. कोकिळा रंगाने काळी असली तरी तिचा आवाज फार मधुर असतो. तिचे डोळे गुंजेसारखे लाल असतात.
आमच्या खिडकीतून आंब्याचे झाड दिसते. त्या झाडावर मार्च ते मे ह्या काळात आम्हाला कोकिळा दिसते. कधीकधी रात्रीच्या वेळेसही ती मंजूळ कुजन करीत असते तेव्हा वाटते की हिला झोप येतच नाही की काय?
वसंत ऋतू आला की आंब्याच्या झाडांना मोहर येतो त्याच वेळेस कोकिळा कुहू कुहू अशी मंजुळ साद घालीत आपल्याला दिसू लागते. कारण तो तिचा अंडी घालण्याचा मौसम असतो. गंमत म्हणजे त्याच वेळेस कावळेसुद्धा घरटे बांधून अंडी घालतात. कोकिळा स्वतः घरटे बांधत नाही. ती कावळ्याच्या घरट्यात स्वतःचे अंडे घालते. कावळी आपल्या पिलांसोबत कोकिळेचे पिल्लू वाढवते. परंतु ते पिल्लू मोठे झाले की काव काव असे ओरडत नाही. तेव्हा कुठे कावळीला कळते की हा तर कोकीळ आहे.
संस्कृत साहित्यात कोकिळेला खूप मानाचे स्थान आहे. कुठल्याही स्त्रीचा आवाज मधुर असला की तिला कोकीळकंठी असे म्हणतात. अशी ही कोकिळा मला खूप खूप आवडते.
पुढे वाचा:
- माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी
- माझा आवडता नेता निबंध मराठी
- माझा आवडता थोर समाजसुधारक मराठी निबंध
- माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी
- माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी
- माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध
- माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
- माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी
- माझा आवडता अभिनेता निबंध मराठी
- माकडांची शाळा निबंध मराठी
- महाराष्ट्रातील अभयारण्ये मराठी निबंध
- महापूर निबंध मराठी
- महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती निबंध मराठी