Set 1: माझा आवडता विषय मराठी निबंध – Maza Avadta Vishay Marathi Nibandh
आमच्या शाळेत आम्हांला अनेक विषय शिकवतात. त्यांपैकी मराठी हा विष्ट मला खूप आवडतो. आमच्या मराठीच्या बाई खूप छान शिकवतात. आम्ही साळजार त्यांच्या तासाची वाट पाहत असतो.
गणिताच्या पुस्तकात सगळीकडे गणितेच असतात. पण मराठीच्या पुस्तकात तसे नाही. मराठीच्या पुस्तकात आम्हांला ३० पाठ आहेत. सर्व पाठ वेगवेगळे अहर छान छान कविता आहेत. आमच्या बाई कविता छान वाचतात. कधी कधी कवितला सुरेख चालही लावतात. आम्हा सर्वांना मोठ्याने म्हणायला सांगतात. तीच कविता आम्ही दिवसभर गुणगुणत असतो.
पुस्तकातल्या गोष्टी वाचताना तर आम्हांला खूप आनंद मिळतो बहु केट खेळतो’ हा पाठ चालू होता, तेव्हा आम्ही खूप हसलो. ‘शब्दांच्या सहवासात हमाल शिकवताना बाईंनी शब्दांच्या खूप गमती सांगितल्या. थोर माणसांवरील पालच्या वेळी बाईंनी आम्हांला त्यांच्या खूप आठवणी सांगितल्या. वाईट हस्ताक्षरामुळे कशा गमती घडतात किंवा अशुद्ध लेखनामुळे कोणत्या गमती घडतात, हे आमच्या बाई नेहमी सांगतात. मराठी विषयामुळेच मला वाचनाचा छंद जडला. हा माझा आवडता विषय आहे, असे मी सर्वांना अभिमानाने सांगतो.
Set 2: माझा आवडता विषय मराठी निबंध – Maza Avadta Vishay Marathi Nibandh
भाषा हा माझा सर्वात आवडता विषय आहे. मला आमच्या भाषाविषयातील धडे वाचायला खूप आवडतात. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरची माहिती मिळते. माणसे कशी जगतात, प्रत्येकाचे जीवन कसे वेगळे असते हे त्यातील धड्यांमुळे आम्हाला समजते.
कवितांच्या भागात आम्हाला केशवसुत, कुसुमाग्रज, ना. धों. महानोर, मंगेश पाडगावकर अशा महान कवींच्या कविता आहेत. त्या कविता चालीवर म्हणताना माझ्या तर पाठच होऊन जातात.
भाषा हा कुठल्याही समाजाचा ठेवा असतो, त्या त्या भाषेत जे साहित्य लिहिलेले असते त्यातून त्या समाजाचे मन, त्याची विचार करण्याची पद्धत, तेथील वेगवेगळ्या प्रथा आपल्याला समजतात.
भाषा हा विषय फक्त अभ्यासापुरताच घ्यायचा नसून त्यामुळे TOIR SIMU आपल्याला वाचनाची गोडी लागते. वाचनाची गोडी लागली तर आपल्याला पुस्तकांसारखे चांगले मित्र मिळतात. शिवाय आपले म्हणणे योग्य शब्दांत कसे मांडायचे हे ही चांगलेच समजते. म्हणूनच फक्त परीक्षेपुरताच भाषेचा विचार करणे चुकीचे आहे.
आमच्या भाषाविषयाच्या शिक्षिका नाडकर्णीबाई ह्यांनी आम्हाला ह्या विषयाची आवड लावली. त्या आम्हाला अभ्यासक्रमातल्या पाठांसोबत आणि कवितांसोबत इतरही चांगली माहिती देत असतात त्यामुळे भाषाविषयाच्या तासात आम्ही मुले खूप रंगून जातो.
Set 3: माझा आवडता विषय मराठी निबंध – Maza Avadta Vishay Marathi Nibandh
इयत्ता पाचवीपासून आम्हाला वेगवेगळे विषय अभ्यासाला येतात. त्या त्या विषयाचा अभ्यास करताना समजते की अमुक एक विषय आपल्याला आवडतो किंवा तमुक एक विषय फारसा आवडत नाही. परंतु शाळेत असताना तर आपल्याला सर्वच विषयांचा अभ्यास करावा लागतो. मुळात त्या वेळी तो प्रत्येक विषयाला केलेला केवळ वरवरचा स्पर्श असतो. तो त्या विषयाचा सखोल अभ्यास नसतो. आपल्याला काय आवडते ह्याची रूपरेषा त्यातून मिळते. कधीकधी एखादा विषय आपल्याला त्या विषयाच्या शिक्षकांमुळेसुद्धा आवडू लागतो.
माझ्या आवडीचा विषय आहे मराठी. एकुणच मला भाषाविषय खूप आवडतात. कविता तर दोनचार वेळा वाचल्यावर तोंडपाठच होतात. निबंधसुद्धा मी चांगले लिहितो असे आमचे सर म्हणतात. ते नेहमी वर्गात मी लिहिलेला निबंध वाचूनही दाखवतात.
त्यावरून मला वाटते की मला भाषाविषयाची चांगली गोडी आहे. माझे वाचनही चांगले आहे. ह्या वर्षीपासूनच आम्हाला हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषासुद्धा अभ्यासाला आल्या आहेत.त्याही भाषामला आवडतात.
भाषेचे सौंदर्य माझ्या मनाला भुरळ घालते. आईने मला म्हटले की अभ्यासाला बस, की मी लगेच मराठीचे बालभारती हे पुस्तक उघडतो. ह्या पुस्तकातील लेखकांनी लिहिलेले अन्य साहित्य आमच्या शाळेच्या ग्रंथालयात आम्हाला वाचायला मिळते. ते वाचल्यामुळे त्या लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन काय आहे ते कळते. हल्लीच मी रणजित देसाई ह्यांची ‘स्वामी’ कादंबरी वाचायला घेतली आहे. ती वाचताना मी पार पेशवाईच्या काळात गेलो आहे असे मला वाटते.
भाषा हा विषय आवडीचा असल्यामुळे माझी आई मला म्हणते की तू थोडा मोठा झालास की एखादी विदेशी भाषा शिकायला सुरूवात कर. मोठा झाल्यावर मी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही करू शकतो. ग्रंथपालशास्त्र किंवा भाषातज्ञही होऊ शकतो. जाहिरात व्यवसायातील कॉपी रायटिंग किंवा टीव्ही क्षेत्रातही काम करू शकतो. खरोखरच तुमच्या आवडीच्या विषयात व्यवसाय करता येणे आजच्या काळात अजिबातच कठीण नाही हे मात्र अगदी निश्चित आहे.
पुढे वाचा:
- माझा आवडता विषय इतिहास
- माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध
- माझा आवडता पक्षी कोकिळा निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी
- माझा आवडता पक्षी चिमणी निबंध मराठी
- माझा आवडता नेता निबंध मराठी
- माझा आवडता थोर समाजसुधारक मराठी निबंध
- माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी
- माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी
- माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध
- माझा आवडता ऋतू हिवाळा मराठी निबंध
- माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध मराठी
- माझा आवडता अभिनेता निबंध मराठी