Set 1: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध – Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

मांजर हा पाळीव प्राणी आहे. त्याच्या अंगावर मऊ मऊ केस असतात. त्याचे डोळे घारे असतात. मांजराला मिशाही असतात. मांजर पांढऱ्या, काळ्या किंवा करड्या रंगाचे असते. ते ‘म्यांवड म्यांवऽ’ करून ओरडते.

मांजराला दूध फार आवडते. मांजराला अंधारातही दिसते. म्हणूनच ते रात्री दबा धरून बसते व उंदीर पकडते. माऊची पिल्ले फार गोंडस असतात. मांजराला आपले अंग फुगवता येते. तळपायाला असलेल्या मऊ स्नायूंमुळे मांजर कितीही उंचावरून अलगद खाली उडी मारू शकते. चालताना तिच्या पायाचा आवाज होत नाही. काही माणसे आवडीने मांजर पाळतात. मांजर फार लबाड असते. ती आपल्या मालकाचा डोळा चुकवून चोरून दूध पिते.

Set 2: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध – Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

मांजर हा माझा आवडता प्राणी आहे. आमच्या घरात एक मांजर आहे. तिचे अंग करड्या रंगाचे आहे. तिला लांब मिश्या आहेत. तिचे डोळे मण्यांसारखे चमकतात. तिचे अंग मऊमऊ व गुबगुबीत आहे. तिच्या अंगावरून हात फिरवायला मला आवडते.

आमची मांजर अत्यंत चपळ आहे. ती खांबावर, छपरावर झरझर चढते. ती झाडावरही चढते. उंदराला तर ती चटकन पकडते. तिला उंदीर खूपच घाबरतात. ती उंदरांपासून घरातील अन्नधान्याचे रक्षण करते.

आमच्या मांजराला आम्ही नेहमी दूध देतो. दुधात भिजवलेली पोळी तिला आवडते. मात्र तिला मासे खूप आवडतात. ती वाघासारखी दिमाखात चालते. वाघासारखीच दिसते, म्हणून तिला ‘वाघाची मावशी’ म्हणतात.

Set 3: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध – Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

मागच्या वर्षी काय झाले की आईने सकाळी दार उघडले तर दारात एक मांजर घोटाळत होती.आईने दार उघडले तर ती आपली घरातच शिरली आणि म्याव म्याव करीत इकडे तिकडे फिरू लागली. तिला बहुदा भूक लागली असावी. तेवढ्यात मला जाग आली. ती पांढरेशुभ्र मनीमाऊ बघून मला खूपच गंमत वाटली. तो जणू काही लोकरीचा मऊमऊ गुंडाच होता. मी आईला म्हटलं की ‘मला ही मनीमाऊ पाळायची आहे.

” त्यावर आई म्हणाली,” तुला जमणार आहे का ते? चार दिवस कौतुक करशील, पुढे मग मात्र तिचा व्याप माझ्याच गळ्यात पडेल.” पण मी आईला बाणेदारपणे सांगितलं, “नाही, मी तिला सांभाळणार म्हणजे सांभाळणार.” तेव्हापासून खरोखरच मी माझ्या मनूची चांगली काळजी घेते. तिला रोज सकाळी दूध प्यायला देते. माझ्या पानातली पोळी पण देते. बाकी तिचे फारसे काही करावे लागत नाही. आई म्हणते की मांजर माणसांवर नाही तर घरावर प्रेम करते. म्हणूनच तर त्याच्या गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधता येत नाही. आईचे म्हणणे खरे आहे कारण मी शाळेतून घरी आल्यावर मनी काही कुत्र्यासारखी नाचत माझ्या स्वागताला पुढे येत नाही. ती मस्त दुपारचं उन खात आमच्या गॅलरीत बसलेली असते. ती एकदा डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहाते. बस्…बाकी काही करीत नाही.

आमचे घर तळमजल्यावर आहे त्यामुळे आमच्या घरात उंदरांचा फार त्रास होता. परंतु मनीमाऊ आल्यामुळे हा त्रास हल्ली बराच कमी झाला आहे. मग मी आईला म्हणते की माझ्या मांजरीमुळेच तुझ्यामागची कटकट किती कमी झाली ते पाहा.

मांजरीला वाघाची मावशी असे म्हणतात कारण दोघांचाही जन्म एकाच मार्जार कुळात झाला आहे. मांजर आपली पिल्ले एकटीच सांभाळते. उलट बोक्यापासूनच त्या पिलांचे रक्षण तिला करावे लागते. मांजरीच्या पिलांचे डोळे जन्मल्यावर पहिले सात दिवस उघडलेले नसतात. त्यामुळे तर तिला त्यांची फारच काळजी घ्यावी लागते. ती त्यांची मानगूट तोंडात पकडून त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेते ते अगदी बघण्यासारखे

Set 4: माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध – Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

मांजर हा प्राणी जरी पाळीव असला तरी त्याला कुत्र्यासारखा पट्टा बांधता येत नाही. कारण हा प्राणी आपल्या घरात राहूनही स्वतंत्र बाण्याचा असतो. मांजरे काळी, पांढरी, तपकिरी अशी वेगवेगळ्या रंगाची असतात. त्यांचे डोळे घारे असतात. सयामी मांजराचे डोळे मिचमिचे असतात.

मांजराला दूध खूप आवडते. त्यामुळे ते स्वयंपाकघरातल्या पातेल्यात तोंड घालणार नाही ना ह्याची काळजी घ्यावी लागते. तसेच ते उंदीरही शिकार करून खाते त्यामुळे ज्या घरात उंदरांचा त्रास असतो असे लोक मांजर पाळतात. तसेच धान्याच्या कोठारातही उंदीर येत असल्यामुळे तिथे मांजरांचा वावर असतो. मांजराला मासे खूप आवडतात त्यामुळे कोळणींच्या आसपास खूप मांजरे दिसतात.

मांजराला वाघाची मावशी असे म्हणतात कारण दोघेही एकाच पशुवर्गातले आहेत. त्यांच्या दिसण्यात आणि सवयींतही साम्य आहे फक्त मांजर वाघापेक्षा आकाराने खूप लहान असते. मांजरी आपल्या पिलांना मानेला पकडून उचलते पण तिची नखे तिच्या पिलांना लागत नाहीत.

मांजराला रात्रीच्या वेळेस दिसते. त्याचे डोळे अंधारात चमकतात. लहान मुलांना मांजराची पिल्ले खूप आवडतात. मुलांच्या विश्वात मांजराचे स्थान अढळ आहे.

‘मनीमाऊ, मनीमाऊ नेहमीच तुला हवा खाऊ, उठता बसता गुरूगुरू, म्याव म्याव सदा सुरू…” अशी भरपूर गाणी मांजरांवर लिहिली गेली आहेत. असे हे मांजर मला खूप आवडते.

Set 5: मी पाळलेली मांजर मराठी निबंध – My Favourite Animal Cat Essay in Marathi

पशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.

मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला ‘राणी’ म्हणतो. राणी म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी राणीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो.

माझी राणी मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो, उड्या मारतो. तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.

राणी घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणू आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. शत्रू असतो. पण राणीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत राणी गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते.

राणी मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप कुत्रा मांजरीचा आठवण येते.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध – Maza Avadta Prani Manjar Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply