माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध – Maza Avadta San Gudi Padwa Nibandh

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा होय. भारतीय सौर वर्षाप्रमाणे हा दिवस म्हणजे वर्षाचा पहिला दिवस. हिंदू धर्मियांच्या नववर्षाला याच दिवशी प्रारंभ होतो. हा दिवस शुभदिवस मानून अनेक लोक नवीन कामाचा शुभारंभ, नवीन खरेदी याच दिवशी करतात.

गुढीपाडवा या सणाला खूप प्राचीन परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत आगमन केले. लोकांनी त्यांचे स्वागत गुढ्या उभारुन केले. आजही हा सण लोक गुढ्या उभारुन साजरा करतात.

चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी आलेली असते. निसर्ग खुललेला असतो. सगळीकडे रंगांची उधळण चाललेली असते. हवेतील गारवा कमी होऊन तापमान वाढायला सुरूवात होते. जणू उन्हाळ्याची चाहूल या शुभदिनी होते.

गुढीपाडव्यादिवशी लोक सकाळी लवकर उठतात. अभ्यंगस्नान करतात. देवाची मनोभावे पूजा करतात. गुढीला कलश अडकवतात. जरीचे कापड लावतात. गुढी उभी करून तिची पूजा करतात. पुरणपोळी व कडुनिंब, गूळ, हरभऱ्याची डाळ, खोबरे, धने यांच्या मिश्रणाचा नैवेद्य दाखवतात. या सणादिवशी सर्वजण आवडीने हे मिश्रण खातात आणि कडक उन्हाळ्याला सामोरे जाण्यास सज्ज होतात. या दिवशी विद्यार्थी अनेक संकल्प करतात. शुद्ध आचरण आणि सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात.

माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध – Maza Avadta San Gudi Padwa Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply