माझे विरंगुळ्याचे क्षण निबंध मराठी
कधी कधी मला अभ्यास करायचा कंटाळा येतो, कधी मित्रांबरोबर खेळायलाही नकोसे वाटते, बाहेर भटकायला जाण्याचीही इच्छा नसते; अशा बेचैन अवस्थेत मी पुस्तक वाचत बसणे पसंत करतो. दरवेळी वाचण्यासाठी नवीनच पुस्तक असावे, अशीही माझी अपेक्षा नसते. माझ्याजवळ विविध पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. यांतील बरीचशी पुस्तके मला भेट म्हणून मिळालेली आहेत.
काही पुस्तके तर माझ्या वाचनाचा छंद लक्षात घेऊन वेळोवेळी बाबांनी मला घेऊन दिली आहेत. त्यांत काही कथासंग्रह आहेत, काही प्रवासवर्णने आहेत, तर काही चरित्रात्मक व आत्मचरित्रात्मक पुस्तके आहेत. ही पुस्तके मी अनेक वेळा वाचलेली आहेत; पण यांतले कोणतेही पुस्तक परत वाचतानासुद्धा मला पूर्वीइतकाच आनंद मिळतो.
माझा मामा उत्तम चित्रकार आहे. त्याने मला चित्रकला शिकवली. तेव्हापासून रंगरेषांचे सुंदर जग मला मोहवून टाकते. मग एखादया सुट्टीच्या दिवशी नदीच्या काठावर जाऊन निसर्गचित्रे रेखाटत बसण्यात मी रमून जातो.
डोंगरावर एकट्याने हिंडायला जाणे, मला खूपच आवडते. तेथील झाडेझुडपे माझ्याशी गुजगोष्टी करतात. एवढेच काय डोंगरावरील मोठमोठे खडकही माझ्याशी गप्पा मारतात. वृक्षवल्लींशी माझी पटकन सोयरीक जुळते आणि माझ्या मनाला टवटवी येते.
मला विरंगुळा देणारे आणखी एक पवित्र स्थान आहे. ते म्हणजे माझी आजी. तिच्याशी थोड्या वेळात ज्या मनमोकळ्या गप्पागोष्टी होतात, त्या मनाला विरंगुळा देतात आणि माझ्या मरगळलेल्या मनाला उभारी मिळते.
पुढे वाचा:
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध
- माझे गाव निबंध मराठी
- माझे कुटुंब निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझे आवडते महिने – चैत्र आणि श्रावण
- माझे आवडते फूल निबंध मराठी
- माझे आवडते फूल कमळ निबंध मराठी
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी
- माझे आवडते पुस्तक महाभारत मराठी निबंध
- माझे आवडते झाड निबंध मराठी
- माझी सोसायटी निबंध मराठी
- माझी मावशी निबंध मराठी
- माझी मामी निबंध मराठी
- माझी महत्वाकांक्षा निबंध मराठी
- माझी दैनंदिनी निबंध मराठी