प्राणी आमचे मित्र मराठी निबंध

माणूस आणि प्राणी हे हजारो वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. देवांनीही प्राण्यांशी मैत्री साधली आहे. भगवान महादेवाजवळ नंदी आहे, श्रीगणेशाआधी भेटतो त्याचा मूषक त्रिमूर्ती दत्तांबरोबर असतात त्यांचे श्वान व गोमाता.

कुत्रा हा माणसांचा रक्षकमित्र आहे. अमेरिकेत स्फोट झाले, तेव्हा एका कुत्र्याने आपल्या अंध मालकाला ऐंशीव्या मजल्यावरून सुरक्षितपणे खाली आणले. बैलांविषयी पूर्वीच्या काळच्या अनेक कथा ऐकायला मिळतात.

कितीही संकटे आली, तरी ते आपल्या मालकांना घरी सुरक्षित आणत. पूर्वी युद्धात राजेरजवाडे हत्ती, अश्व यांचा उपयोग करत. ते मुके प्राणी आपल्या मालकांच्या रक्षणासाठी अनेकदा मरणही स्वीकारत.

जंगलातील प्राणीही कधी आपल्याला आश्चर्य करायला लावतात. शकुन पक्ष्यांनी आईने टाकलेल्या बालिकेचे रक्षण केले, म्हणून ती ‘शकुंतला’ झाली. जंगलबुक या कथेतही जंगलातील प्राणी त्या कथेतील मुलाला सांभाळतात. एकंदरीत, प्राणी हे आपले मित्रच आहेत.

पुढे वाचा:

Leave a Reply