मी सायकल शिकते तेव्हा निबंध मराठी

चौथीच्या वर्गात माझा पहिला क्रमांक आला. म्हणून मामाने मला सायकल बक्षीस दिली. मी एकदम खूश! मी त्याच दिवशी आईच्या मागे लागले. तिची मदत घेतली आणि सायकल शिकायला सुरुवात केली.

आमच्या घराच्या जवळच मैदानात सायकलचा पहिला धडा सुरू झाला. मी सायकलवर बसले. मात्र, चालवायला सुरुवात करण्याआधीच तोल जाऊ लागला. मी मनातल्या मनात घाबरले. पण आईने धीर दिला. तिने सायकल घट्ट पकडली होती.

मी पेडल मारू लागले. मला जमीन सरकत असल्याचे दिसू लागले. माझी भीती वाढू लागली. हँडल डुगडुगू लागले. सायकल कधी इकडे, तर कधी तिकडे जाऊ लागली. मध्येच तोल जाऊ लागला. मी सायकल सोडून आईला मिठी मारायची. अशा त-हेने आठ-दहा फेऱ्या झाल्यावर आई दमली आणि आमचा तो कार्यक्रम त्या दिवशी संपला.

पुढे वाचा:

Leave a Reply