मी सरपंच झालो तर निबंध लेखन – Mi Sarpanch Zalo Tar Nibandh Lekhan
प्रत्येक माणूस कोणते ना कोणते स्वप्न पाहात असतो. प्रत्येकालाच स्वप्नात रंगून जायला आणि स्वप्नाळू जगात हरवून जायला खूप आवडते. कोणी म्हणतो, मी डॉक्टर झालो तर आजारी लोकांची सेवा करीन तर कोणी म्हणतो, मी सैनिक झालो तर देशाचे रक्षण करीन. मला मात्र सारखे वाटते, मी सरपंच झालो तर..
मी सरपंच झालो तर प्रथम गावसभा बोलावीन गावातील सर्व पुरुष-स्त्रिया उपस्थित राहण्यासाठी जनजागृती करीन. सारा गाव जमा झाला की सभेस सुरुवात करून लोकांना आपल्या आणि गावाच्या समस्या मांडण्यास उद्युक्त करेन.
गावातील लोकांनी मांडलेल्या समस्यांचं वर्गीकरण करून वेगवेगळ्या समित्या स्थापना करून त्या समित्यांच्या माध्यमांद्वारे गावचा विकास साधून गाव सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. आरोग्य समिती, शिक्षण समिती, तंटा मुक्त समिती, कृषी समिती, विकास समिती, गावसमिती, हागणदारी मुक्त समिती, समस्या निवारण समिती अशा समित्यांद्वारे गावचा कारभार उत्तमप्रकारे करण्याचा प्रयत्न करीन.
गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, बंद गटारे, दिवाबत्तीची सोय, सर्व सुविधांनी युक्त अशी शाळा, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन, छोट्या उद्योगांना प्रोसाहन, बचतगटांमार्फत महिला सबलीकरण, हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव अशा विविध सुविधांचा लाभ लोकांना मिळवून देऊन विविध योजना राबवून एक स्वयंपूर्ण गाव करण्याचा प्रयत्न मी सरपंच घाल्यावर नक्कीच करीन.
पुढे वाचा:
- मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी
- मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध
- मी मासा झालो असतो तर मराठी निबंध
- मी बाभूळ आहे मराठी निबंध
- मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध
- मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी
- मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण निबंध मराठी
- मी पाहिलेली धार्मिक क्षेत्रे निबंध मराठी
- मी पाहिलेला सूर्यास्त निबंध मराठी
- मी पाहिलेला वृद्धाश्रम निबंध मराठी
- मी पाहिलेला महापूर निबंध मराठी
- मी पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळ
- मी पहिल्यांदा आगगाडीने गेलो तेव्हा निबंध मराठी
- मी पंतप्रधान झाले तर निबंध मराठी