मी पाहिलेला डोंबाऱ्याचा खेळ – Mi Pahilela Dombaryacha Khel
लहानपणापासून मला डोंबारी, माकडवाला, दरवेशी यांचे खेळ पाहण्याची विलक्षण आवड आहे. आपण तिकिटे काढून सर्कशीला जातो, प्राणिसंग्रहालयाला भेट देतो; पण डोंबाऱ्याचा खेळ पाहायला काही आपल्याला तिकीट काढावे लागत नाही.
त्या दिवशी शाळेला सुट्टी होती. दुपारच्या वेळी ‘ढूढूम’ असा डोंबाऱ्याच्या ढोलक्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मी धावतच बाहेर आलो. डोंबाऱ्याचे कुटुंब आमच्या गल्लीतील मोकळ्या जागी आले होते. त्यातील बाप्या आपले ढोलके जोरजोराने वाजवत होता. आपला खेळ पाहण्यासाठी त्याला स्वत:च्या भोवती प्रेक्षकांची गर्दी हवी असते. आपल्या ढोलक्याच्या आवाजातून तो प्रेक्षकांना सांगत असतो, “या, या, आमचा खेळ पाहायला या!”
पुरेशी गर्दी जमल्यावर डोंबाऱ्याने आपल्या खेळाला सुरवात केली. डोंबारी हा त्या खेळातील जणू कॅप्टनच होता. त्याचबरोबर तो खेळाचा निवेदकही होता. आपल्या मुलाबाळांनी सुरू केलेल्या खेळाचे तो रसभरीत वर्णन करत होता. जणू धावते समालोचनच! त्याचबरोबर तो प्रेक्षकांना टाळ्या वाजवून कसरत करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास आवाहनही करत होता.
डोंबाऱ्याच्या मुलांनी कोलांट्या उड्या मारून व वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून लोकांना रिझवले. नंतर त्या डोंबाऱ्याने काही चित्तथरारक खेळ करून दाखवले. त्याने हातातल्या काठीने तोल सावरत उंचावर बांधलेल्या दोरीवरून चालून दाखवले. त्याने आपल्या लहान बाळाला काठीवर बांधून ती काठी दातांवर पेलली.
डोंबान्याच्या बायकोने आपल्या केसांना एक प्रचंड धोंडा बांधून तो वर उचलला. नंतर डोंबाऱ्याने कमालच केली. त्याने एका बुक्क्यात मोठा-थोरला दगड फोडला. तेव्हा लोकांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट केला. .
ते सारे पाहून माझ्या मनात आले की, ऑलिंपिकमधील खेळांडूच्या वाट्याला येणाऱ्या कौतुकाचा काही अंशसुद्धा या अभागी कसरतपटूंच्या वाट्याला येणार नाही का?
पुढे वाचा:
- मी पहिल्यांदा आगगाडीने गेलो तेव्हा निबंध मराठी
- मी पंतप्रधान झाले तर निबंध मराठी
- मी ढग झालो तेव्हा निबंध मराठी
- मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध
- मी कोण होणार निबंध मराठी
- मी अवकाशात गेलो तर निबंध मराठी
- मानवाधिकार निबंध मराठी
- माणुसकी निबंध मराठी
- माणसे अमर झाली तर मराठी निबंध
- माणसाला भाषाच येत नसती तर निबंध मराठी
- माझ्या हातून झालेली चूक निबंध मराठी
- माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण मराठी निबंध
- माझे बाबा निबंध मराठी
- माझा आवडता छंद मराठी निबंध