मी पाहिलेला वृद्धाश्रम निबंध मराठी

आमच्या गावाच्या शेजारी एक वृद्धाश्रम आहे. एके दिवशी आईच्या मैत्रिणी तेथे जात होत्या. आईपण त्यांच्याबरोबर चालली होती. आईने मलाही त्यांच्यासोबत नेले.

आम्ही दुपारी अकराच्या सुमारास आश्रमात गेलो. आश्रमाचे आवार खूप मोठे होते. त्या आवारात खूप झाडे होती. त्यामुळे तेथे सावली होती. आम्ही गेलो, तेव्हा काही आजी-आजोबा आवारात हिंडत होते. काहीजण सावलीत बसून गप्पा मारत होते. कुणी आजोबा वर्तमानपत्र वाचत होते. आई व तिच्या मैत्रिणी त्यांच्याशी गप्पा मारू लागल्या. आईने सर्वांसाठी लाडू करून नेले होते. ते मी सर्व आजी-आजोबांना वाटले.

मग आई व तिच्या मैत्रिणी काही आजोबांशी बोलल्या. त्या आजोबांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. एका आजोबांना त्यांच्या घरी पत्र पाठवायचे होते. त्यांनी मजकूर सांगितला व मी ते पत्र लिहून दिले. ठीक बारा वाजता जेवणाची घंटा झाली मग सर्व आजीआजोबा मोठ्या हॉलमध्ये जमले. त्यांनी प्रार्थना म्हटली आणि भोजन सुरू झाले. मीपण त्यांच्याबरोबर तेथे जेवले. जेवण साधेच, पण रुचकर होते. दुपारी चहापान झाल्यावर आम्ही परतलो.

मी पाहिलेला वृद्धाश्रम निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply