मी सागरातील एक मासा निबंध मराठी – मी मासा बोलतोय – माशाचे मनोगत निबंध

“ओळखलंत का मी कोण आहे ते? मी आहे परमेश्वराचा प्रथमावतार – मत्स्य ! पृथ्वीवरील माणसांच्या कल्याणासाठी भगवंतांना वारंवार अवतार घ्यावे लागले. तेव्हा त्यांनी प्रथम माझे रूप निवडले. तेव्हापासून ‘मानवसेवा’ हाच माझा जीवनधर्म झाला आणि तो मी अखंड पाळत आहे.

समुद्र, नदी किंवा अन्य जलाशयांत माझे वास्तव्य असते. तुम्ही माणसे तुमच्या नाना उद्योगांनी आमचे जीवन संकटात आणता. आता हेच पाहा ना ! तुम्हांला भूगर्भातील तेलाचा पत्ता लागला, तेव्हा तुम्ही सागर ढवळून काढलात. त्यामुळे आमच्या स्वच्छंदी जगात किती खळबळ माजली ! एवढेच नव्हे, तर तुमच्या या ‘सागरसम्राट ‘वरील विहिरीमुळे नुकतीच पाण्याला आग लावणारी एक अघटित घटना घडली. तुमच्या औदयोगिक क्रांतीतून अनेक कारखान्यांना तुम्ही जन्म दिला; पण कारखान्यांतील दूषित पाणी व विषारी द्रव्ये तुम्ही सागरात आणून सोडता. त्यामुळे कित्येकदा माझे हजारो भाईबंद मृत्युमुखी पडतात. याचाच जाब तुम्हांला विचारण्यासाठी मी येथे आलो आहे.

सांगा पाहू, आम्ही तुमचे काय बिघडवले आहे ते? एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे, मासे समुद्रात राहतात, समुद्रातील वनस्पती खातात, समुद्रातील पाणी पितात, तरी कोळी त्यांना पकडतात. का? तुम्ही आपल्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी

आम्हांला बदनाम करता, म्हणे — मोठा मासा लहान माशाला खातो’ खरे म्हणजे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही आमची हत्या करता. परदेशी चलन मिळवण्यासाठी आमची निर्यात करता. पण एक लक्षात ठेवा की, असे करता करता समुद्रातील आम्ही सारेच एके दिवशी संपून जाऊ हेच तुम्हांला सांगण्यासाठी आज मी येथे पाण्याबाहेर आलो आहे.”

पुढे वाचा:

Leave a Reply