मी पाहिलेला सूर्यास्त निबंध मराठी – Mi Pahilela Suryast

आमची वार्षिक परीक्षा संपली होती. संध्याकाळची वेळ होती. आम्ही मैत्रिणी गच्चीत खेळत होतो. गार वारे शांतपणे वाहत होते. मनाला आनंद होत होता. सहजच माझे लक्ष क्षितिजाकडे गेले. सूर्य मावळत होता. त्याचे सौम्य रूप आल्हाददायक वाटत होते. मी एकटक त्याच्याकडे पाहत राहिले.

सूर्य झपाझप क्षितिजाकडे सरकत होता. त्याचे बिंब आता मोठे दिसत होते. नारिंगी-सोनेरी रंग क्षितिजावर पसरला होता. पश्चिम दिशा झळाळत होती. झाडांची पाने, घरांची छपरे, डोंगराचे शिखर सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाले होते. पाहता पाहता सूर्यबिंब क्षितिजाखाली जाऊ लागले.

शेवटी एक सोनेरी बिंदू क्षितिजावर उरला आणि पुढच्या क्षणी तोही लुप्त झाला. हळूहळू अंधार पसरू लागला. कितीतरी वेळ मी मावळतीकडे पाहतच राहिले. सूर्यास्ताचे हे दृश्य मी कधीच विसरणार नाही.

मी पाहिलेला सूर्यास्त निबंध मराठी – Mi Pahilela Suryast

पुढे वाचा:

Leave a Reply