मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध – Mi Fulpakharu Zalo Tar Marathi Nibandh

परीची छडी फिरली की म्हणे वाटेल तो बदल होतो. त्यामुळे मला कधी कधी वाटते की, परीची छडी फिरली आणि आपले फुलपाखरू झाले, तर किती मज्जा येईल !

मी फुलपाखरू झाले, तर माझी फुलांशी खूप दोस्ती होईल. दिवसभर मी त्यांच्याशी गप्पागोष्टी करीन. मग मला शाळेत जाण्याची कटकट राहणार नाही. गृहपाट करण्याची डोकेदुखी उरणार नाही आणि परीक्षेचा झक्कूही राहणार नाही.

दुसरा एक मोठा त्रास वाचेल; तो म्हणजे आईचा ससेमिरा उरणार नाही. रोज जेवायला बसले की, आईच्या सूचना सुरू होतात – पालेभाजी खा. सॅलड खा. भात घे. आईचा आग्रहाचा तो मारा नकोसा असतो. फुलपाखरू झाले की, फक्त फुलांतील मधच चोखायचा!

काही घरांतील द्वाड मुले फुलपाखरांना फार छळतात. पंखांना दोरी बांधतात आणि काही दुष्ट मुलेमुली तर फुलपाखरांना पकडून बाटलीत ठेवतात. बाप रे! असे झाले, तर मात्र भयंकर परिस्थिती ओढवेल. मी काहीही करू शकणार नाही. त्यापेक्षा नको हे फुलपाखरू होणे!

मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध – Mi Fulpakharu Zalo Tar Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply