मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी – Mi Pahilelya Vegveglya Vata

सुट्टीमध्ये मामाच्या घरी जायला निघालो की, मामाचे घर माझ्या डोळ्यांसमोर येते. त्याबरोबरच मामाच्या घराकडे जाणारी सुंदर वाट दिसू लागते. त्या वाटेच्या दोन्ही कडा दगडांनी बांधलेल्या आहेत.

वाटेवर नदीतील लहानमोठे गुळगुळीत दगड पसरलेले आहेत. दोन्ही बाजूंना ओळीने फुलझाडे लावलेली आहेत. त्यामुळे त्या वाटेने मामाच्या घराकडे पुन्हा पुन्हा जावे, असे वाटत राहते.

मामाच्या घराकडून नदीकडे जाणारी वाट मला फारच आवडते. ती वाट बांधांवरून जाते. मी दोन्ही हात पसरून तोल सावरत त्या वाटेवरून जातो. देवळाकडे जाणारी वाटही सुंदर आहे. ती वळणावळणाची व चढउतार असलेली अशी आहे. रानात तर वाटांचे जाळेच दिसते. शहरातील आमच्या मैदानाकडे जाणारी वाट मात्र मला मुळीच आवडत नाही.

ही वाट इमारतींच्या मधून जाते. वाटेत खूप कचरा पडलेला असतो. अशा या वाटा काही आवडत्या, काही नावडत्या.

मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी – Mi Pahilelya Vegveglya Vata

पुढे वाचा:

Leave a Reply