मी पाहिलेली धार्मिक क्षेत्रे निबंध मराठी

आम्ही शनिवारी सकाळी आठ वाजता गावातून निघालो. प्रथम औंध येथील यमाई देवीचे दर्शन घेतले आणि जवळजवळ २०० ते २५० पायऱ्या उतरुन गेल्यानंतर आम्हाला वस्तुसंग्रहालय पहायला मिळाले. तेथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता, पूर्वीच्या राजांचे तसेच देवादिकांचे मूर्तीमंत स्वरुप पाहून धन्य वाटले. देवांनी निरनिराळे म्हणजे गरुड, नाग तसेच वराह यांचे रुप घेऊन राक्षसांवर कसा विजय मिळविला.त्यासाठी पर्जन्यास्त्र, अग्निअस्त्र तसेच त्रिशूल, भाला ही हत्यारे वापरुन राक्षसांचा बिमोड कसा केला ही छायाचित्रे पहायला मिळाली. तसेच रामायण महाभारतातील थोर व्यक्तिंचे फोटोग्राफ्स पाहण्याची संधी मिळाली.

तिथून ठिक दुपारी १ वाजता आम्ही पुसेगाव येथे जाण्यास निघालो. तिथे तीन वाजता पोहोचलो तेथील श्री. सेवागिरी महाराजांचे दर्शन घेतले, जेवण केले अन् शिखर-शिंगणापूरला जाण्यासाठी निघालो. शिंगणापूरला आम्ही ३.३० च्या दरम्यान पोहोचलो. महादेवास अभिषेक घालून दर्शन घेऊन पंढरपुरला गेलो. प्रथम कैकाडी महाराजांचा मठ पाहिला. कितीतरी शतकापूर्वीचे थोर संत तसेच राजे आणि वैशिष्ट्यपुर्ण लोकांचे दर्शन घेऊन निघालो इमारतीची रचना इतकी सुबक सुंदर आणि कुशलतेने केली होती की आबालवृद्धापासून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. गरुड, सुसर, मासा, रेल्वे ही साधने प्रवेशद्वार म्हणून योजिली होती. तसेच देवळाच्या अग्रभागी विष्णू, शंकर यांचे मूर्तिमंत दर्शन झाल्याप्रमाणे वाटले. पाहून मन प्रसन्न झाले. नंतर रात्र झाल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रात फक्त हातपाय धुण्यातच समाधान मानावे लागले. विठ्ठलाचे दर्शन घेतले.

तिथून ठिक आठ वाजता निघालो अन् रात्री २ वाजता तुळजापूर येथे पोहोचलो. लॉज प्रथमच हाऊसफुल असल्याने देवीच्या प्रवेशद्वारा जवळच रात्र घालविली. सकाळी विधीपूर्वक भवानीमातेचे दर्शन घेतले आणि सामान खरेदी केले. तिथून ठिक १२ वाजता आम्ही गाणगापूर येथे जाण्यासाठी निघालो. गाणगापूर येथील दत्ताचे, पादूकांचे दर्शन घेतले. दिवसभर तिथे फिरुन सायंकाळी ठीक पाच वाजता आम्ही विजापूरला निघालो. स्वामी समर्थ अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन दर्शन, स्वामी समर्थ दर्शन घेतले आणि दुर्दैवाने सिंदगी येथे आमची गाडी बंद पडली. त्यामुळे मुक्काम करावा लागला. भाषेची इतकी अडचण भासली कारण तिथली भाषा कन्नड व आमची मराठी तशात हिंदी ही राष्ट्रभाषाही त्यांना कळत नव्हती परंतु तिथून ठीक ४ वाजता निघालो व एकेकाला रस्त्यातून सोडत सोडत घरी पोहोचलो. खूप आनंदात जवळजवळ १००० किमी. प्रवास संपविला.

आमच्या जीपचा ड्रायव्हर कन्नड असल्याने वेळ भागली. नातेवाईकांच्या ओळखीमुळे बँकेच्या एका इमारतीत मुक्कामास जागा मिळाली.

सकाळी लवकर उठून विधी आटोपले तोच गाडी दुरुस्त झाली. तिथून ठिक ९ वाजता आम्ही विजापूरला जायला निघालो. कर्नाटकचा तो प्रदेश इतका मागास आहे की लोक अधिक प्रमाणात अशिक्षित आहेत आणि पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने शेतीसुधारणा कमी प्रमाणात होते. त्यामुळे मुख्यतः मोलमजुरी हा लोकांचा व्यवसाय आहे.

दुपारी दोन वाजता आम्ही विजापुरला गोलघुमट या प्रसिद्ध इमारतीजवळ पोहोचलो. तिथे आदिलशहाची कबर पहावयास मिळाली. ३२२ पायऱ्या चढून उतरुन अगदी दमलो. एकूण सातमजली इमारत इतक्या कुशलतेने वसविली आहे की एकदा बोललेल्या आवाजाचा पडसाद सात वेळा नोच नोच ऐकावयास मिळतो. माझ्या बालभावंडांनी निरनिराळे आवाज काढून अर्धातास करमणूकीचा कार्यक्रमच केला. त्यामुळे चालून थकलेल्या शरीराला विरंगुळा मिळाला. पौराणिक वस्तुंचे प्रदर्शन पहावयास मिळाले. पोरसेलीनने बनविलेले चिलखत, जिरेटोप या लोखंडी वस्तु, पूर्वीची हत्यारे पाहिली. हंडे व प्लेट इतक्या नक्षीदार होत्या की आपणाला तशी कलाकुसर बनवता येईल का असा प्रश्न पडतो. तेथील हिरवळीवर आराम करुन लगेच फोटो मिळणाऱ्या कॅमेऱ्याने फोटो काढून घेतले. जामिया मस्जीद, शहरातील सर्वात मोठा तलाव आणि किल्ला पाहिला. .

पुढे वाचा:

Leave a Reply