मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण निबंध मराठी – Mi Pahile Nisargramya Thikan

“मे महिन्याची सुट्टी संपत आली होती, तेव्हा बाबांनी सहलीचा बेत आयोजित केला. शनिवारी सकाळी बाबा म्हणाले, “चला, आपण महाबळेश्वरला जाऊ.’ यापूर्वी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो; पण ही सहल होती चेरीच्या बागेला भेट देण्यासाठी.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे मे महिन्यातही जाणवत होते. ऑर्थरसीट, लॉडविक पॉइंटला भेट देऊन आम्ही वेण्णा तलावावर पोहोचलो. बहुतेक पर्यटकांनी तेथे गर्दी केली होती. काही वेळ नौकाविहार केल्यावर आम्ही बाबांच्या मित्रांच्या मळ्याकडे गेलो.

या मळ्यात सगळीकडे हिरवा आणि तांबडा रंग दिसत होता. हिरवी पाने आणि लाल चेरी. ते दृश्य पाहून डोळे दिपून गेले. मळ्यात गेल्यावर काका म्हणाले, “आता तुम्ही मनसोक्त हिंडा आणि हव्या तेवढ्या चेरी खा.” आम्ही धावत सुटलो.

सर्व झाडे रांगेत लावली होती. रांगांमध्ये चालण्यासाठी लहान वाटा ठेवल्या होत्या. हिरव्या पानांत लाल लाल चेरी लपल्या होत्या. काही ठिकाणी पानांपेक्षा चेरीच जास्त होत्या. डोळे आणि पोट दोन्हीही तृप्त झाले. त्या सुंदर स्थळापासून दूर जाऊ नये असेच वाटत होते! वाईट हस्ताक्षरामुळे कशा गमती घडतात किंवा अशुद्ध लेखनामुळे कोणत्या गमती घडतात, हे आमच्या बाई नेहमी सांगतात, मराठी विषयामुळेच मला वाचनाचा छंद जडला, हा माझा आवडता विषय आहे, असे मी सर्वांना अभिमानाने सांगतो.

मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण निबंध मराठी – Mi Pahile Nisargramya Thikan

पुढे वाचा:

Leave a Reply