Set 1: मोबाईल निबंध मराठी – Mobile Essay in Marathi

मोबाईल आजकाल विशेष लोकप्रिय आहे. प्रत्येकाच्या खिशात किंवा कानाजवळ मोबाईलला स्थान! लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाटते. त्यामुळे खेळण्यातही मोबाईल आला आहे.

दूरध्वनीचेच काम मोबाईल करतो. पण मोबाईल हे फार पुढचे पाऊल आहे. दूरध्वनीवर जी बंधने होती, ती मोबाईलने तोडून टाकली आहेत. त्याला ‘वायर’ लागत नाही, कोणत्याही जोडणीची त्याला आवश्यकता नसते. त्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही वेळी मोबाईलचा उपयोग करता येतो.

मोबाईल वापरण्यास सोपा असतो. त्यामुळे अशिक्षित लोकही तो वापरतात. फिरती कामे करणाऱ्यांना हा फार उपयोगी पडतो. एका जागी बसून कामे मिळवता येतात. येण्या-जाण्यातील वेळेचा अपव्यय टळतो. काही मोबाईलमध्ये गाणी ऐकणे, फोटो काढणे अशा सोयीसुविधाही असतात. काही लोक त्याचा दुरुपयोगही करतात. मात्र अडचणीत संकटांच्या वेळी मोबाईलचा चांगला उपयोग होतो. म्हणून तो आपला मित्र आहे.

Set 2: मोबाईल निबंध मराठी – Mobile Essay in Marathi

वेगवेगळे शोध लागतात आणि थोड्याच काळात ते लोकप्रिय होतात. मोबाईलचेही तसेच आहे. भारतात पहिला मोबाईल १९९४ साली आला. तेव्हा मोबाईल ही गोष्ट लोकांना जादूसारखीच वाटली. सुरूवातीला मोबाईल महाग होते. दर मिनिटाला १६ रूपये लागत. कॉल आला तरीही पैसे पडत. त्यामुळे श्रीमंत लोकच तो वापरू शकत होते. आता मात्र तसे नाही. आता मोबाईल अगदी इस्त्रीवाल्यापासून ते कामवाल्या बाईपर्यंत सर्वांकडे असतो.

मी लहान असल्यामुळे अजून मला आईबाबांनी मोबाईल घेऊन दिलेला नाही पण घरात असताना मी त्यांच्या मोबाईलवर गेम्स खेळतो.

मोबाईलचे फायदे खूप आहेत. त्यामुळे आपण कधीही आपल्या घरच्यांच्या संपर्कात राहू शकतो. शिवाय हल्लीचे नवेनवे मोबाईल म्हणजे तर मिनी-संगणकच झाले आहेत. त्यावर फेसबुक, इमेल, बँकेतील पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा असते. शिवाय व्हॉट्स अपच्या माध्यमातून फोटो पाठवता येतात, निरोप पाठवता येतात. म्हणजे कितीही दूर.. अगदी परदेशात जरी कुणी गेले तरी तो कुणाशीही बोलू शकतो. ही खूप छान सोय आहे.

मला वाटते की मी कधी मोठा होईन आणि मला मोबाईल घेता येईल.

मोबाईल निबंध मराठी – Mobile Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply