मोग-याच्या फुलाची आत्मकथा – Mogryachya Fulanchi Atmakatha Marathi Nibandh
मोग-याचा गजरा मला खूपच आवडतो. त्याचा वास किती सुंदर असतो. माळ्याच्या टोपलीत मोग-याचे गजरे पाहिले मी ते विकत घेतल्याशिवाय मला चैनच पडत नाही. त्या दिवशी पण असेच झाले. मी मोग-याचे गजरे घेऊन घरी आले तेव्हा माझ्या मनात असाच विचार होता की कुठे असतील ही मोग-याची शेते? ही एवढी फुले कुठे बरे फुलली असतील?
गंमत म्हणजे त्याच रात्री माझ्या स्वप्नात मोग-याचे फूल आले. ते मला म्हणाले की तुला मी खूप आवडतो ना म्हणून तुला माझी गोष्टच सांगणार आहे मी. तुमच्या भारतात फुले देणा-या वनस्पतींच्या जाती एकुण १५००० आहेत. त्यातील सर्वात सुंदर आणि सर्वात सुगंधी जात माझीच असावी. कुंदुमल्लिगै, जस्मिन आणि मल्लिका ह्या नावांनीसुद्धा मला ओळखतात. सुंदर सुंदर बागबगीचातला माझा वेल म्हणजे त्या बगीचाची मोठी शानच असते. माझा वेल साधारण आठ ते दहा फुट वाढतो. ह्या वेलावर ताटव्याताटव्यात माझी फुले फुलतात. तुमच्या ज्ञानेश्वरांनीही ‘मोगरा फुलला, तयाचा वेलू गेला गगनावरी’ असा अभंग माझ्यावर लिहिला आहे.
माझा रंग शुभ्र पांढरा असतो आणि गंध तरी फारच सुवासिक असतो. बटमोगरा नावाची माझी एक जात आहे. ती फुले थोडी मोठी असतात. तशी माझी पैदास जगभरच होते. तुमच्या भारतात साधारण जून ते सप्टेंबर ह्या काळात माझी लागवड करतात. नियमितपणे पाणी घातले, पुरेसा सूर्यप्रकाश असला, माती थोडीशी दमट असली तर माझी वाढ चांगली होते. मात्र मातीत फार पाणी साठून राहाता कामा नये. मधूनमधून खत घातले आणि वेलाला चांगला आधार दिला की माझ्या वेलाला फुलेही पुष्कळ येतात.
माझे खूप औषधी उपयोग आहेत. कावीळ आणि अल्सर बरे करण्यासाठीच्या औषधात माझा वापर होतो. ट्युमरवर उपचार करण्यासाठीही माझा वापर होतो. जस्मीनटी बनवण्यासाठीही माझा उपयोग करतात. हा चहा नियमित प्यायल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते असे म्हणतात. अत्तरे, साबण, शांपू, उदबत्त्या, गजरे, हार, लग्नसमारंभातील सजावट इत्यादी कामीही मी लोकांच्या उपयोगी पडतो. माझे तेल डोक्याला लावले तर डोके शांत राहाते. देवाच्या चरणी वाहाण्यासाठीही माझा उपयोग होतो. .
बरे ग, मुली, खूप बोललो मी. आता मला थोडी विश्रांती दे. तुझ्या फ्रिजच्या थंडाव्यात फार गारठलो आहे मी..” तेवढ्यात मला जाग आली. म्हणजे हे मोग-याचं फूल त्याची कहाणी सांगायला माझ्या स्वप्नात आले होते तर!”
पुढे वाचा:
- मुलामुलींनी एकत्र शिक्षण घ्यावे काय?
- आंब्याचे झाडाचे मनोगत निबंध मराठी
- मी स्पर्धेत भाग घेते निबंध मराठी
- मी शाळेचे दप्तर बोलतोय
- मी सैनिक झालो तर निबंध मराठी
- मी सायकल शिकते तेव्हा निबंध मराठी
- मी सागरातील एक मासा निबंध मराठी
- मी सरपंच झालो तर निबंध लेखन
- मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी
- मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध
- मी मासा झालो असतो तर मराठी निबंध
- मी बाभूळ आहे मराठी निबंध
- मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध
- मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी