मी स्पर्धेत भाग घेते निबंध मराठी
आमची शाळा खूप नामांकित शाळा नाही, तरीही ती मला खूप आवडते. आम्ही शाळेत खूप आनंदात असतो. कारण आमच्या शाळेत दरवर्षी अनेक स्पर्धा होतात. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या स्पर्धात भाग घेतो. खूप मजा येते.
गेल्या वर्षी मी मैत्रिणीबरोबर अभिनय स्पर्धेत भाग घेतला. मी आणि सविताने एकत्र अभिनय केला. आमचा विषय होता- ‘नळावर भांडणाऱ्या स्त्रिया’. आम्ही खूप तयारी केली. आधी संवाद लिहून काढला. त्यासाठी आईबाबांचीही मदत घेतली आम्ही एके दिवशी नळावरील पाणी भरण्याचा प्रसंग पाहिला.
तेथे स्त्रिया कसे बोलतात, कसे वादविवाद करतात, याचे निरीक्षण केले. त्यानुसार संवादात सुधारणा केली. त्यामुळे आमचा कार्यक्रम खूप रंगला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आम्हांला पहिले बक्षीस मिळाले हे सांगायला नकोच!
स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे आनंद मिळतो. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. अपयश पचवण्याची शक्ती मिळते. म्हणून मी नेहमी स्पर्धेत भाग घेते.
पुढे वाचा:
- मी शाळेचे दप्तर बोलतोय
- मी सैनिक झालो तर निबंध मराठी
- मी सायकल शिकते तेव्हा निबंध मराठी
- मी सागरातील एक मासा निबंध मराठी
- मी सरपंच झालो तर निबंध लेखन
- मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी
- मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध
- मी मासा झालो असतो तर मराठी निबंध
- मी बाभूळ आहे मराठी निबंध
- मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध
- मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी
- मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण निबंध मराठी
- मी पाहिलेली धार्मिक क्षेत्रे निबंध मराठी
- मी पाहिलेला सूर्यास्त निबंध मराठी