मी स्कूल बॅग बोलतेय – मी शाळेचे दप्तर बोलतोय – शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त
नमस्कार. मला ओळखलस ना! अग, मी तुझी रोजची मैत्रीण, तुझी शाळेत पुस्तके नेण्याची बॅग. तूच तर दहा दुकान फिरुन मला त्या मोठया दुकानातुन विकत आणले. माझा लाल-निळा रंग तुला खूप आवडला होता ना. तुझे त्यावेळचे उद्गार मला अजून आठवतात, “आहा! काय सुंदर बॅग आहे ही” असे आईला म्हणाली होतीस तू. तेव्हा पासून मी तुझी जीवा-भावाची मैत्रीण बनले. घरी आणल्यावर तू सर्वांना माझ्याबद्दल सांगत सुटलीस. अगदी झोपताना सुद्धा मला सोबत घेऊनच झोपलीस. तर आता मी तुला माझ्याबद्दल थोडी माहिती देते.
माझा जन्म एका मोठया कारखान्यात झाला. एका मोठ्या मजबूत निळया रंगाच्या कापडापासून मला व माझ्या बहिणींना बनविण्यात आले. त्यानंतर लाल रंगाच्या कापडापासून माझे खिसे बनविले गेले. त्यावर मोठ-मोठी बटणे व बक्कल लावून मला छान सजविले गेले. मग मी खराब होऊ नये यासाठी मला एका प्लास्टिकच्या पिशवीत बंद केले गेले. त्यानंतर एका गाडीत बसून मी व माझ्या इतर बहिणी या दुकानात आलो.
तुझ्या घरी आल्यावर तर तू माझी किती काळजी घेतेस! मला कुठे जखम होऊ नये, मार लागू नये म्हणून प्रयत्न करतेस. पाऊस, उन यापासून माझे रक्षण करतेस. सुटी लागल्यावर मला तुझ्या कपाटात सुरक्षित जागी ठेवतेस. सुट्यांमध्ये मला अजिबात करमत नाही. कधी एकदा शाळा सुरु होईल असे होते.
शाळेच्या दिवसात मात्र मी सतत तुझ्यासोबत असते. तुझ्या बाजूला बसुन मी तुझ्या अभ्यासावर लक्ष ठेवते. तू तुझा गृहपाठ कसा करतेस हे बघते. तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली यात मला आनंद वाटतो. मला तुझा अभिमान वाटतो.
पुढे वाचा:
- मी सैनिक झालो तर निबंध मराठी
- मी सायकल शिकते तेव्हा निबंध मराठी
- मी सागरातील एक मासा निबंध मराठी
- मी सरपंच झालो तर निबंध लेखन
- मी शाळेची घंटा बोलते निबंध मराठी
- मी वाढवलेले रोपटे मराठी निबंध
- मी मासा झालो असतो तर मराठी निबंध
- मी बाभूळ आहे मराठी निबंध
- मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध
- मी पाहिलेल्या वेगवेगळ्या वाटा निबंध मराठी
- मी पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण निबंध मराठी
- मी पाहिलेली धार्मिक क्षेत्रे निबंध मराठी
- मी पाहिलेला सूर्यास्त निबंध मराठी
- मी पाहिलेला वृद्धाश्रम निबंध मराठी