मी सैनिक झालो तर निबंध मराठी – Mi Sainik Zalo Tar Nibandh Marathi

‘माणसाने स्वत:साठी जगू नये तर देशासाठी जगावे.’ .असे आमचे शिक्षक म्हणतात आणि म्हणून जर देशाची सेवा करायची असेल तर एक तर शेतकरी व्हावे किंवा सैनिक व्हावे कारण ‘जय जवान जय किसान’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

शेतकरी झालो तर मातृभूमीची सेवा करता येईल. पण मी जर सैनिक झालो तर ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता सतत देशाच्या सीमेवर पहारा देता येईल. हिमालय जसा सतत आमचे शत्रूपासून रक्षण करतो तसाच मीही पहारा करीन. शत्रूच्या वाईट नजरेला भारतभूमीकडे वळू देणार नाही. इतर भारतीयांनाही हीच शिकवण देणार. म्हणजे आमचा देश असाच स्वतंत्रपणे जीवन जगेल.

आणि हे सगळे करताना माझ्या जीवाचे बलिदान जरी झाले तरी चालेल. असाच एक स्वदेशाभिमानी हुतात्मा होण्याची माझी इच्छा आहे. पण हे सगळे कधी शक्य होईल जर मी सैनिक झालो तरच !

मी सैनिक झालो तर निबंध मराठी – Mi Sainik Zalo Tar Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply