नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी – Naisargik Apatti Nibandh in Marathi

निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. तो माणसाला खूप वैभव देतो. तसेच, तो माणसांवर कधी कधी संकटांचाही वर्षाव करतो.

एखादया वर्षी माणसांना दुष्काळाला तोंड दयावे लागते. पाऊस पडतच नाही. शेते ओसाड राहतात. माणसांची उपासमार होते, गुरांना ओलासुका कोणताच चारा मिळत नाही. असा हा दुष्काळ अनेकांचे प्राण घेतो.

एखादया वर्षी अतिवृष्टीचे संकट कोसळते. नदयांना पूर येतात. त्या महापुरात माणसांची घरेदारे, शेतेवाड्या वाहून जातात. नुकसान किती झाले याची गणतीच राहत नाही. महापूर ओसरला की रोगराई पसरते.

भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती. अचानक भूमी थरथरू लागते. क्षणार्धात रस्ते, घरेदारे कोसळतात. माणसे व पशुपक्षी गाडले जातात. भूकंपामुळेही रोगराई पसरते. समुद्रातील भूकंपामुळे त्सुनामी नावाच्या महाकाय लाटा निर्माण होतात. या लाटा किनाऱ्यावरील गावेच्या गावे उद्ध्वस्त करतात. वादळामुळेसुद्धा प्रचंड जीवितवित्तहानी होते.

या संकटांना काही प्रमाणात माणूससुद्धा जबाबदार आहे. माणूस वायुप्रदूषण, जलप्रदूषण व ध्वनिप्रदूषण करतो; वारेमाप जंगलतोड करतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल नाहीसा होतो. यामुळे ही संकटे सहजपणे ओढवतात. तेव्हा, माणसाने पर्यावरण सांभाळले, तरच तो जिवंत राहू शकेल.

नैसर्गिक आपत्ती

पुढे वाचा:

Leave a Reply