नियमितपणाचे महत्व निबंध मराठी

जगात नियमितपणाला फार महत्व आहे. हे जगच किती नियमितपणे चालते पाहा ना. सूर्य रोज वेळेवर उगवतो. रोज रात्रही वेळेवर होते. त्यामुळे सगळी कामे व्यवस्थित होतात. पावसाळाही दर वर्षी नियमितपणे येतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला आणि दुष्काळ पडला की आपल्याला नियमितपणाचे महत्व चांगलेच समजते.

आमची शाळा पण नियमितपणे चालते. शाळेतले शिक्षकही नियमितपणे वर्गावर येऊन आमचा सर्व अभ्यास वेळेवर पूर्ण करतात. त्यामुळे आम्हालाही विषयांची गोडी लागते. केवळ परीक्षेपुरता अभ्यास काय कामाचा?

नियमितपणे अभ्यास केला की परीक्षेच्या वेळेस ताण येत नाही आणि झोप उडत नाही. नियमितपणे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे म्हणजे तब्येत चांगली राहाते. नियमितपणे वाचनही केले पाहिजे म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपला फावला वेळही चांगला जातो. नियमितपणाच्या चौकटीत आपण आयुष्य नीट बांधले की आपल्याला कसलाही त्रास फार जाणवत नाही.

नियमितपणे काम केल्याने आपले प्रसंगावधानही वाढते. हातून चुका फारशा होत नाहीत म्हणून मला नियमितपणे वागायला खूप आवडते. असे आहे नियमितपणाचे महत्व.

पुढे वाचा:

Leave a Reply