नंदीबैल निबंध मराठी
नंदीवाला हा आम्हा मुलांचा प्रिय मित्रच आहे. त्याच्या वाट्याचा गुबगुबूऽऽ असा आवाज आला की, आम्ही अंगणाकडे धाव घेतो. त्याच्यासोबत त्याचा नंदीबैलही असतो.
नंदीवाला नंदीबैलाला छान सजवतो. लाल-गुलाबी रंगांची मखमलीची झूल बैलाच्या पाठीवर असते. रंगीबेरंगी कापडाच्या पट्ट्यांनी त्याची शिंगे सजवलेली असतात. कपाळावर चमचमणारे लहान लहान आरसे लावलेले असतात. गळ्यात घुगूरमाळा व पायात पैंजण असा साज त्याच्या अंगावर असतो. अशा रीतीने सजवलेल्या नंदीबैलाला घेऊन नंदीवाला दारोदार हिंडतो.
नंदीबैल भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे. घरातल्या लोकांचे प्रश्न नंदीवाला नंदीबैलाला सांगतो आणि ढोलकीवर गुबूगुबूऽऽ असा आवाज करतो. नंदीबैल मान हलवून उत्तर देतो. नंदीवाला कधी कधी गमतीदार प्रश्न विचारतो आणि अंगणात हास्याचा धबधबा कोसळतो. मग नंदीबैलाला धान्य व पैसे दिले जातात. नंदीबैलाचा हा खेळ आम्हा मुलांना खूप खूप आवडतो.
पुढे वाचा:
- ध्वनी प्रदूषण निबंध मराठी
- मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी
- दूरदर्शनचे फायदे व तोटे
- दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
- दूरचित्रवाणी निबंध मराठी
- दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
- दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
- दूध निबंध मराठी
- दिल्लीची कथा निबंध मराठी
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
- गरिबी एक शाप मराठी निबंध