नदीची कैफियत निबंध मराठी – Nadichi Kaifiyat in Marathi

सुट्टीत मी मामाकडे गेले होते. एके दिवशी मी मामाबरोबर नदीवर गेले. नदीवर बरीच गडबड होती. काही स्त्रिया पाण्यातच भांडी घासत होत्या आणि तेथेच पाणी भरत होत्या. काहीजणी धुणी धूत होत्या.

कोणी नदीत पोहत होते. एका बाजूला दोन-चारजण आपल्या गुरांना धूत होते. सगळेजण नदीचे पाणी दूषित करत होते. ते पाहून मला खूप दु:ख झाले. मनात आले, ही नदी बोलू लागली, तर काय बोलेल? आणि नदी खरोखरच बोलू लागली!

नदी सांगत होती- “मुली, तुला माझे दु:ख कळले, म्हणून मी तुझ्याशी बोलत आहे. तुम्ही मला लोकमाता म्हणता. माझी पूजा करता. माझी ओटी भरता. पण तुम्हीच माझे पाणी दूषित करता! तूच पाहिलेस ना? हे माझे पाणी मी तुमच्यासाठी किती जपून आणते! तुमची तहान भागावी, तुमची शेते फुलावीत, हाच माझा उद्देश असतो.

“मोफत आणि सहज मिळणाऱ्या या पाण्याची तुम्हांला किंमत वाटत नाही. त्यामुळे सर्व प्रकारे तुम्ही माझे पाणी दूषित करता. कारखान्यातील दूषित, मलिन पाणी माझ्या पाण्यातच सोडता. यामुळे पाण्यातील मासे नष्ट होतात. हे दूषित पाणी शेतीलाही वापरता येत नाही. अशा पाण्यामुळे माझ्या काठावरील जमीन नापीक बनते. आता लवकरच माझे अस्तित्व नष्ट होईल म्हणून तुम्हांला सावध करते.

नदीची कैफियत निबंध मराठी – Nadichi Kaifiyat in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply