नव्या युगाचे मागणे निबंध मराठी

आज आपण नव्या युगात राहत आहोत. पूर्वी माणसे धोतर नेसत. टोपी घालीत. आता कोणी धोतर नेसत नाही. आपला पोशाख बदलला आहे. कारण आज काळ बदलला आहे. म्हणून आपले आचरणसुद्धा बदलले पाहिजे. नव्या युगाप्रमाणे आपण वागले पाहिजे.

यासाठी आपण काय केले पाहिजे? सर्वप्रथम एक गोष्ट केली पाहिजे. कोणतेही काम कमी लेखू नये, आपल्याला सांगितलेले काम मनापासून केले पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट केले पाहिजेत, आपले सर्व सामर्थ्य वापरून आपले काम केले पाहिजे.

तसेच, मनात गर्व बाळगता कामा नये, जात वा धर्म यांवरून भेदभाव पाळता कामा नये, सर्व माणसे आपले बांधव आहेत, असे मानले पाहिजे, समानता हाच खरा धर्म आहे. नव्या युगाचे हेच मागणे आहे. त्यानुसारच आपण आचरण केले पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply