नको हा मेला पोरीचा जन्म निबंध मराठी

हल्लीच्या काळात मुलीचा जन्म म्हणजे पित्याच्या डोक्यावर टांगलेली तलवारच भासते. प्रत्येक स्त्री गरोदर असल्यापासून मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस करत असते आणि बाळंतीण झाल्यावर मुलगी झाली तर नाराज होते. इतरांकडून विचारणा होताच काहीतरी अपराध घडल्याप्रमाणे मुलगीच झाली असे सांगते. विचारणाराही ‘अरे देवा ! मुलगीच होय ?’ लागा आता हुंडयाचा तयारीला अशी प्रतारणा होते. म्हणूनच वाटते ‘नको हा मेला पोरीचा जन्म ! जन्मापासूनच पिता तिच्या वाढीच्या, लग्नाच्या काळजीने ग्रासलेला असतो. मग ती मुलगी कितीही हुशार, सुंदर किंवा सद्गुणी असो.

हल्ली लग्नाच्या बाजारात मुलीच्या गुणारुपाकडे लक्ष द्यायला वरपक्षाला रस नसतो. वधूपक्ष अधिक हुंडा देत असेल तर ती मुलगी कुरुप, अशिक्षित अगर बाहेरख्याली वर्तनाची असेल. चट्टे मुरुमांनी तिच्या चेहऱ्याला विद्रूप केले असेल तरी ते पत्करले जाते. सासूसासऱ्यांकडून अधिक हुंडा मिळताच आपण अधिक मालदार होवू अशी जावयाची भावना असते. अधिक थाटाभाटात लग्न करुन दिले तर लग्नाच्या बाजारात वराची किंमतही वधारते. आपल्याला जास्त किंमत मिळते या भावनेने तो सुखावतो.

मुलीची परिस्थिती गरीब असेल, वधूपिता, जावई बापूंना हुंडा देवू शकत नसेल. घरातील लहानमोठे सर्वजण तिची हेटाळणी करतात जसे काही गरीब कुटूंबात जन्माला येणे तिचा गुन्हाच असतो. तिचा छळ सुरु होतो बंदिनीसारखे खोलीत कोंडून घातल जाते. अत्रपाणी न देता उपाशी ठेवले जाते. या नवऱ्यालाही सुखाने जगायचे नसते का ? असाही प्रश्न पडतो. सासूसासऱ्यांनी स्वत:चे आयूष्य जगून मुलाच्या ष्यात का ढवळाढवळ करावी. एवढ्यावरच न थांबता आता सुनेच्या माहेराहून काही मिळणार नाही अशी खात्री पटताच तिचा खून करतात किंवा तिला जाळून मारतात. या सर्वांमुळे पुरुषप्रधान असणाऱ्या या देशात स्त्रियांना नगण्य स्थान असल्याचे जाणवते त्यामुळेच म्हणावेसे वाटते. ‘नको हा मेला पोरीचा जन्म.’

पुढे वाचा:

Leave a Reply