नारळी पौर्णिमा विषयी निबंध – Narali Purnima Nibandh Marathi

भारतात अनेक धर्मांचे लोक वास्तव्य करुन आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण परंपरेनुसार साजरे केले जातात. तसाच महाराष्ट्रातील मच्छीमार समाज म्हणजे कोळी लोक. हे लोक श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात. आणि सागर देवतेला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ समुद्राला मनोभावे नाचत कोळीनृत्य करता करता अर्पण करतात.

याच दिवशी भारतात घडलेल्या प्राचीन इतिहासाची पुनरावृत्ति म्हणून आणि बहिण भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून बहीण भावाला राखी बांधते. या दिवशी घरात गोडधोड पदार्थ बनविले जातात. बहीण भावाला आरतीने ओवाळते. राखी बांधते. भाऊही आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो. नारळीपौर्णिमेलाच राखीपौर्णिमा असेही म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो.

नारळी पौर्णिमा विषयी निबंध – Narali Purnima Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply