निसर्ग माझा मित्र निबंध मराठी – Nisarg Majha Mitra Essay in Marathi

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. संत तुकाराम महाराजांनी खरोखरच फार मोठे सत्य सांगितले आहे. वृक्षवल्ली म्हणजेच हा अवघा निसर्ग आपला सखा आहे. तो आपला मित्र आहे. आपला मित्र आपल्याला सदोदित मदतच करतो. त्याप्रमाणे निसर्गही आपल्याला दत करतो.

उन्हातान्हातून हिंडताना झाडे आपल्याला सावली देतात. नेहमीच्या कामामुळे आपण कंटाळतो, म्हणून आपण सहलीला जातो. खरे म्हणजे निसर्गाच्या सहवासात जातो. आपल्या मित्राच्या सहवासात जातो आणि आनंद मिळवतो. इमारती व पूल बांधण्यासाठी निसर्गच आपल्याला लाकूड व दगड पुरवतो.

पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी निसर्गच देतो. आपल्याला फुले, फळे व अन्न निसर्गाकडून मिळतात. इतकेच काय, आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू निसर्गच पुरवतो. असा हा निसर्ग आपला मित्र आहे. तो आपला पोशिंदा आहे.

अशा या मित्राची, निसर्गाची आपण काळजी घेत नाही. आपण जलप्रदूषण करतो; वायुप्रदूषण करतो. आपण वारेमाप जंगलतोड करतो. निसर्गाचा समतोल बिघडवतो. निसर्गाचा समतोल नष्ट झाला, तर आपण जगूच शकणार नाही. हा आपला मित्र, म्हणजे निसर्ग, आपल्यावर प्रेम करतो. आपणही तसेच निसर्गावर प्रेम केले पाहिजे.

निसर्ग माझा मित्र निबंध मराठी – Nisarg Majha Mitra Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply