पाचवीतील पहिला दिवस निबंध मराठी

आता मी पाचवीत गेलो होतो. मी मोठा झालो होतो. म्हणून मी एकटाच मित्रांबरोबर शाळेत गेलो. आता आई सोबत नव्हती. मी नवीन गणवेश घातला होता. दप्तर नवीन होते. सर्व पुस्तके नवीन होती. मी वयापुस्तकांना छानसे कव्हर घातले होते.

शाळेचा पहिला दिवस म्हणून मी स्वत:च लवकर उठलो. भरभर सर्व तयारी केली आणि ऐटीत शाळेकडे निघालो. कधी एकदा शाळेत पोहोचतो, असे मला वाटत होते. बहुतेक सर्वजण शाळेत लवकर आले होते.

सगळे मित्र भेटल्यावर खूप धमाल आली. गप्पांना सुरुवात झाली. आम्ही एकमेकांना सुट्टीतील मजा सांगू लागलो. सगळेजण हसत होते. मोठमोठ्याने बोलत होते. एकमेकांची थट्टा करत होते. सर्व विषयांचे तासही आनंदात गेले.

असा आमचा हा शाळेतील पहिला दिवस खूप आनंदात गेला.

शाळेचा पहिला दिवस निबंध

पुढे वाचा:

Leave a Reply