परोपकारासाठी झटावे निबंध लेखन

झाडे आपली फळे स्वत: खात नाहीत, नदया स्वत:चे पाणी स्वत: पीत नाहीत. ढग इकडून तिकडे पाणी वाहून नेतात, ते दुसऱ्यांसाठी. त्याचप्रमाणे सज्जन माणसे जगतात, ते दुसऱ्यांसाठी! स्वत:साठी नव्हे !

आपणही हे तत्त्व लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला इतरांकडूनच सर्व काही मिळते. शेतकऱ्यांमुळे धान्य मिळते. गवंड्यांमुळे घरे मिळतात. आपण ज्या रस्त्यावरून चालतो, तो रस्ता दुसऱ्या लोकांनी तयार केलेला असतो.

म्हणूनच, आपणसुद्धा स्वार्थ पाहता कामा नये. शक्य तेवढी इतरांना मदत केली पाहिजे, घरातल्या लहान भावंडांना सांभाळले पाहिजे. इतरांना अभ्यासात मदत केली पाहिजे. कोणी एखादे काम सांगितले, तर केले पाहिजे. दीनदुबळ्यांना साहाय्य केले पाहिजे. परोपकारातच माणुसकी आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply