Set 1: परीक्षा नसती तर मराठी निबंध – Pariksha Nastya Tar Marathi Nibandh

काय म्हणालात परीक्षा नसत्या तर ? अहो पण, जर तुम्हाला डोळे नसते तर, कान नसते तर तर असे अनेक प्रश्न मनात येताच गोंधळ उडतो ना ? मग का म्हणता ? परीक्षा नसत्या तर…

पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकांचा जन्मच झाला नसता. आणि मुलांना अतिशय आनंद झाला असता. कारण मुलांना अगोदरच अभ्यास करण्याचा कंटाळा येतो आणि जर परीक्षा नसती तर मग कोणीही पुस्तकांमधील स्वाध्यायांकडे पाहिलेही नसते.

शिक्षकांनीही प्रश्नोत्तराचा तास ठेवला नसता. आई बाबांचा मार खावा लागला नसता. माझा पहिला नंबर असे नंबर आले नसते आणि कोणाला बक्षीस द्यावे अशी चुरस लागलीच नसती. मग पुढील वर्गात कोणाला घ्यायचे असे झाले नसते. पास-नापास असा भेदभाव करता आला नसता. पण मग त्यामुळे नोकरीत पात्रता ठरवता आली नसती. आणि मग सगळा गोंधळच झाला असता. पण हे सगळे कधी झाले असते जर परीक्षा झाल्याच नसत्या तरच.

Set 2: परीक्षा नसती तर मराठी निबंध – Pariksha Nastya Tar Marathi Nibandh

परीक्षा ! परीक्षा ! परीक्षा ! या परिक्षाच एके दिवशी विद्यार्थीदशेचा जीव घेतील. विद्यार्थी शाळेत जाऊ लागताच परीक्षारुपी राक्षसाला सामोरे जातो. परीक्षा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. एका इयत्तेत चार चाचण्या व दोन सत्रांत परीक्षांमुळे वर्षभरात विद्यार्थ्यांची सुटका होत नाही. या परीक्षाच नसत्या तर विद्यार्थ्याच्या डोक्यावरील चिंतेचा भार कमी होईल. त्यांना पुस्तकी किडा असे म्हणून घ्यावे लागणार नाही. व विद्यार्थी फक्त अभ्यासक न होता तो आपले इतर छंद आणि कला जोपासू लागेल. सभा सम्मेलने आणि समारंभात भाग घेऊ शकतील आणि सुखाने झोपू शकतील.

आजची परीक्षा पद्धती सुद्धा किती विचित्र आहे ? इतक्या मोठ्या अभ्यासक्रमाची कसोटी मात्र तीन तासातच घेणार त्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतात, काही विद्यार्थी तर केवळ महत्त्वाचे प्रश्न तोंडपाठ करुन पास होतात. जर अशी परीक्षा पद्धती नसती तर तो विद्यार्थी विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करु शकेल आणि खऱ्या अर्थाने विद्वान होईल.

जर परीक्षा नसत्या तर या महागाईच्या दिवसांत सर्वसामान्य लोकांना काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना शिकवणी लावावी लागणार नाही. परंतु परीक्षा नसत्या तर कोणत्या आधारावर विद्यार्थ्यांना एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जातायेईल परीक्षा पास झाल्यास आनंद उपभोगता येईल. याउलट परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थी अभ्यासाबाबत बेपर्वाईने वागतील, परीक्षा नाहीत म्हणून मुलेही अभ्यास करणार नाहीत. अभ्यासच केला नाही तर त्यांचे ज्ञान तरी कसे वाढणार ?

खऱ्या ज्ञानाचा आनंद ते कसा घेणार ? खऱ्या बुद्धीची कसोटी लागणारच नाही म्हणून परिक्षा असायलाच हव्यात.

Set 3: परीक्षा नसती तर मराठी निबंध – Pariksha Nastya Tar Marathi Nibandh

आम्ही मुले वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून शाळेत जातो. तेव्हापासून अभ्यास आणि परीक्षा आमची पाठच सोडत नाही. त्यामुळे ‘परीक्षाच नसली तर’ हा निबंधाचा नुसता विषय वाचूनच माझ्या मनाला गोड गुदगुल्या झाल्या. खरोखरच हा परीक्षेचा बागुलबुवा आम्हा मुलांच्या मागे लागला नाही तर जीवन किती सुसह्य होऊन जाईल आमचे.

म्हणजे मला शाळेत जायला खूप आवडते. कारण शाळेतच माझे आवडते मित्र आणि मैत्रिणी मला भेटतात. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करायला, खेळायला मला खूप खूप आवडते. माझ्या मनाला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तर ती टोचणी मी माझ्या मित्रांजवळच व्यक्त करतो. शिवाय शाळेत आम्हाला वेगवेगळे विषय शिकवतात त्यामुळे जगाचे भरपूर ज्ञान आम्हाला मिळते. आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षकही खूप तळमळीने आम्हाला शिकवतात. त्यांना आमच्याबद्दल प्रेम आहे हे आम्हाला जाणवते. मधल्या सुट्टीत खाऊ खायला आणि शाळेच्या सहलींना जायला खूप मज्जा येते. दर वर्षी शाळेत क्रीडास्पर्धा होतात आणि वार्षिक स्नेहसंमेलनही होते.मी ह्या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेतो.

परंतु परीक्षा जवळ आल्या की मात्र आमचा सगळा उत्साह नाहीसा होतो. आमचे विद्यार्थीजीवन अगदी हिरमुसून जाते. शिवाय ह्या परीक्षासुद्धा अगदी पुष्कळ असतात. दर महिन्याची चाचणी परीक्षा, तिमाही, सहामाही, नऊमाही आणि वार्षिक अशाही परीक्षा मागे लागलेल्या असतातच. त्याशिवाय स्पर्धात्मक परीक्षा, अचानक वर्गात घेतलेल्या परीक्षा अशाही परीक्षा असतात. ह्या सा-या परीक्षांचा मनावर ताण येतो. घरातील मोठी माणसे तर येताजाता अभ्यासावरून बोलत राहातात. दहावीच्या मुलांना तर जीव नकोसा होऊन जातो ह्या काळात. परीक्षेच्या काळात मनावर ताण येतोच पण खेळायलाही मिळत नाही, सहली, हॉटेलात खाणे, टीव्ही बघणे सगळ्यावरच आफत ओढवते. शिवाय परीक्षेचे निकाल लागले आणि त्यात जर मनासारखे गुण नाही मिळाले तर आईबाबांची बोलणी खावी लागतात. आपला मान कमी होतो. नापास होऊन त्याच वर्गात बसावे लागणे म्हणजे तर फारच शरमेची गोष्ट असते.

परंतु परीक्षाच नसल्या तरी चालणार नाही. कारण मग आमच्या ज्ञानाची कसोटी लागणारच कशी? परीक्षाच नसेल तर कायमच सुट्टी असल्यासारखे वाटेल. मग त्या सुट्टीचाही कंटाळाच येईल ना. कारण पुष्कळ अभ्यास करून परीक्षा दिल्यावर त्यानंतर मिळणा-या सुट्टीचा आनंद खराच अवर्णनीय असतो. त्याशिवाय परीक्षेत चांगले गुण मिळाल्यावर शाबासकी मिळते, त्या आनंदाचे काय? लहानपणी शाळेत दिलेल्या परीक्षा ही खरी तर पुढे जीवनात द्याव्या लागणा-या परीक्षांची पूर्वतयारीच तर असते. त्यामुळे आपल्याला परिश्रम घेण्याची, मेहेनत करण्याची सवय लागते, आपली स्मरणशक्तीही त्यामुळे वाढते. म्हणून मला वाटते की परीक्षा ह्या हव्यातच. हल्ली सरकारने नियम काढला आहे की आठवीपर्यंत परीक्षा घेऊच नयेत. परंतु हा नियमघातक आहे असे मला वाटते. परीक्षा हव्यातच.

परीक्षा नसती तर मराठी निबंध – Pariksha Nastya Tar Marathi Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply