Set 1: परोपकार निबंध मराठी – Paropkar Nibandh in Marathi
संत तुकारामांनी म्हणून ठेवलेच आहे की ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथचि जाणावा.”
खरोखरच, आपल्या हातून दुस-याचे होता होईल तेवढे चांगलेच करावे. कुणाचेही अहित करू नये. हाच श्रेष्ठ धर्म आहे कारण तो माणुसकीचा धर्म आहे. आपण पाप आणि पुण्याच्या लंब्याचवड्या बाता मारतो परंतु तुकारामांनीच ह्या दोन्ही संकल्पनांची थोडक्यात व्याख्या करून ठेवली आहे. ती म्हणजे,’ पुण्य पर उपकार, पापहे परपीडा. किती खरे आहे ना हे?
परोपकार हा शब्द पर अधिक उपकार ह्या दोन शब्दांची संधी होऊन बनला आहे. परोपकार म्हणजे परतफेडीची अपेक्षा न ठेवता शक्य होईल तेवढी दुस-यास मदत करणे. निसर्गाकडे आपण पाहिले तर सर्वत्र परोपकारच भरून राहिलेला दिसतो. नद्या आपले पाणी स्वतः पित नाहीत, वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाहीत. तसेच आपणही वागले पाहिजे. आपण ह्या समाजात राहातो. आपली नोकरी, उद्योग ह्याच समाजात राहून करतो.
ह्याच समाजामुळे आपल्याला सुखी जीवन जगता येते. म्हणूनच आपण समाजाचे देणे लागतो. समाजातील सगळीच माणसे सुदैवी नसतात. दीन, अनाथ, दुबळी, अपंग, गरीब, वृद्ध,रूग्ण अशीही बरीच माणसे ह्या समाजात असतात. त्यांच्यासाठी निःस्वार्थपणे कसलीही अपेक्षा न ठेवता झटणे म्हणजेच खरा परोपकार. आपल्याला वेळ देता येत नसेल तर चांगले काम करणारी संस्था पाहून त्यांना इच्छेनुसार देणगीही आपण देऊ शकतो.
दर वर्षी माझ्या वाढदिवसाला मी आणि माझे आईबाबा आमच्या घराजवळच्या अनाथाश्रमात जातो. तिथे मी त्या मुलांना खाऊ आणि वह्या, पेन्सिली वाटतो. त्या वेळेस मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन शब्दांत करता येण्यासारखे नाही.
बाबा आमट्यांनी महारोग्यांची सेवा केली. त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून डॉ. मंदाकिनी आमटे हे हेमलकसा येथे आदिवासींची रूग्णसेवा करीत आहेत. डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग हे जोडपे अमेरिकेतील सुखे त्यागून भारतात गरिबांची सेवा करण्यासाठी आले. त्यांनी गडचिरोली येथे उभारलेले सर्च उर्फ शोधग्राम ही संस्था अगदी बघण्यासारखीच आहे.
फक्त स्वतःपुरते पाहाणे आणि अतीलोभ आणि अतीमोह करणे चांगले नाही. मेल्यावर तर आपण चार आणेसुद्धा सोबत घेऊन जाणार नसतो. मग एवढी हाव कशासाठी? असा प्रश्न जर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला तर जगातील अर्धी कुकर्मे नष्ट होतील.
म्हणूनच परोपकार हाच श्रेष्ठ धर्म आहे.
Set 2: परोपकार निबंध मराठी – Paropkar Nibandh in Marathi
पर + उपकार या शब्दाची संधी होऊन परोपकार हा शब्द बनला आहे. परोपकार म्हणजे नि:स्वार्थ भावाने दुसऱ्याची सेवा करणे. आपणास शरण आलेले मित्र, शत्रू, प्राणी, देशी-परदेशी, लहान-थोर सर्वांच्या दुःखाचे निवारण करणे म्हणजे परोपकार हाय. परोपकार हा गुण मानवाला पशूपासून वेगळा करतो.
निसर्गातील कण न् कण आपणास परोपकारची शिकवण देतो. नद्या आपल्याला पाणी म्हणजेच जीवन देतात. वृक्ष स्वत: उन्हात राहून आपणास सावली देतात. सूर्य किरणांनी संपूर्ण जग प्रकाशित होते. चंद्रापासून शीतलता, समुद्रापासून पाऊस, वृक्षांपासून फळे, फुले, भाज्या, गाईपासून दूध, वायूपासून प्राणशक्ती मिळते. निसर्गाचा हाच त्याग आपणास नि:स्वार्थीपणे परोपकार करण्याची शिकवण देतो.
मानवी इतिहासात आणि पुराणांत परोपकारी महापुरुषांची असंख्य उदाहरणे आहेत. त्यांनी परोपकारासाठी आपले सर्वस्व देऊन टाकले. दधिची ऋषी, कर्ण, शिखांचे गुरू. गुरू नानक, येशू खिस्त यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील.
परोपकाराची अनेक रूपे आहेत. ज्या द्वारे व्यक्ती दुसऱ्यांना मदत करून आत्मिक समाधान प्राप्त करते. तहानलेल्यांना पाणी पाजणे, आजारी, जखमी माणासाला दवाखान्यात घेऊन जाणे, वृद्धांना बसमध्ये बसण्यास जागा देणे, आंधळ्याला रस्ता ओलांडण्यास मदत करणे, अशिक्षिताला शिक्षित करणे, भुकेल्यास अन्न देणे, वस्त्रहीन माणसाला वस्त्र देणे, गोशाळा बांधणे, मोफत दवाखान्याला देणगी देण, पाणपोई चालविणे, झाडे लावणे, शाळा व धर्मशाळा बांधणे ही सर्व परोपकाराचीच रूपे होत.
परंतु आधुनिक काळातीत मानव स्वार्थी आणि लोभी होत चालला आहे. दुसऱ्याच्या दु:खाने आनंदी व दुसऱ्याच्या सुखाने दु:खी होतो. मित्राला संकटप्रसंगी मदत करण्याऐवजी पळून जातो. रस्त्यावर जखमी होऊन पडलेल्या माणसाकडे दुर्लक्ष करतो. त्याच्या कण्हण्यामुळे हदयाला पाझर फुटत नाही. जीवन परोपकाराच्या कामात लावूनच आपण खरी शांती मिळवू शकतो. हेच खरे सुख आणि आनंद आहे. परोपकारी व्यक्तीसाठी सारे जगच कुटुंब असते. माणसाने क्षुद्र वृत्ती सोडून परोपकारी बनले पाहिजे. यथाशक्ती दुसऱ्याला मदत केली पाहिजे.
पुढे वाचा:
- परीक्षा रद्द झाल्या तर निबंध लेखन
- परीक्षा नसती तर मराठी निबंध
- परिचारिका निबंध मराठी
- पडक्या मंदिराचे आत्मवृत्त
- पडक्या किल्ल्याचे मनोगत निबंध मराठी
- पंचायत राज्य निबंध मराठी
- नैसर्गिक आपत्ती निबंध मराठी
- नेहरू तारांगणास भेट निबंध मराठी
- निसर्गाचे अमोल भांडार निबंध मराठी
- निसर्ग माझा मित्र निबंध मराठी
- नियमितपणाचे महत्व निबंध मराठी
- नारळी पौर्णिमा विषयी निबंध
- नागपंचमी निबंध मराठी
- नव्या युगाचे मागणे निबंध मराठी
- नदीचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन
- नदीची कैफियत निबंध मराठी
- नदीची आत्मकथा मराठी निबंध