परीक्षा रद्द झाल्या तर निबंध लेखन – Pariksha Radda Zalya Tar Nibandh

परीक्षा जवळ आली की, मला खूप त्रास होतो. सारखा अभ्यास करावा लागतो. खेळता येत नाही. फिरायला जाता येत नाही. परीक्षेच्या दिवशी काही आठवत नाही. डोके दुखते. परीक्षेत उत्तरे नीट लिहिता येत नाहीत. मला वाटते की, परीक्षाच रद्द केल्या पाहिजेत!

खरोखर! परीक्षा रद्द केली, तर किती बरे होईल! मग पाठांतर करावे लागणार नाही. गृहपाठाच्या वया पूर्ण कराव्या लागणार नाहीत. दूरदर्शनवरील कार्यक्रम हवे तितके पाहता येतील. खूप खूप खेळता येईल. चित्रपट पाहायला मिळतील. अभ्यासासाठी आईबाबा दम देणार नाहीत. किती छान!

मात्र, परीक्षा खरोखरच रद्द झाली, तर पास-नापास कसे ठरवणार? पहिला क्रमांक कोणाचा, हे ठरवता येणार नाही. बक्षिसे कोणाला दयावीत, हे कळणार नाही. मग कोणीही डॉक्टर होईल, कोणीही इंजिनियर होईल, मग चुकीच्या औषधांमुळे रोगी दगावतील. घरे कोसळतील. चांगले सैनिक नसतील. म्हणून शत्रू आपल्या देशाला पराभूत करतील.

बाप रे! किती भयंकर! परीक्षा हव्यात! त्या रद्द होता कामा नयेत.

परीक्षा रद्द झाल्या तर निबंध लेखन – Pariksha Radda Zalya Tar Nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply