पडक्या मंदिराचे आत्मवृत्त – Pda Kya Mandirache Atmakatha

एकदा आम्ही क्षेत्रभेटीसाठी जवळच्याच वनराईत निघालो. वनराईतून फिरता-फिरता आम्ही एका अज्ञात स्थळी आलो. सुंदर कोरीव काम असलेले एक रेखीव पण पडक्या अवस्थेतील मंदिर दिसले. आम्ही मंदिराच्या परिसरातील साफसफाई केली.

अचानक एक आवाज माझ्या कानावर आला. “मधू, थांब ना जरा. दु:ख तू जाणून घेणार नाहीस?’ प्रथम माझा परिसर तुम्ही साफ केल्याबद्दल धन्यवाद ! माझी अवस्था कशी झालीय ते तुम्ही पाहात आहातच. भिंतींना मोठ-मोठाल्या फटी पडल्या आहेत. त्यातून गवत, पिंपळ उगवले आहेत. त्यामुळे माझे अधिकच नुकसान होत आहे.

समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी जागोजागी हनुमान मंदिरे उभारली. त्याच काळात माझे बांधकाम झाले. रामभक्त वीर हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. गावचा पुजारी रोज येऊन माझ्या परिसरातील सफाई करायचा. मूर्तीला अंघोळ घालून फुले वाहायचा. गावातील लोकही दर शनिवारी इकडे यायचे. मनोभावे मूर्तीला फुले वाहायचे. इथल्या पारावर तासन्तास गप्पा मारत बसायचे.

पण आज… आज ते गतवैभव कुठे गेले? इकडे चिटपाखरूही फिरकत नाही. देवळात विसाव्यासाठी माणसे यायची. आज मात्र ती जागा उंदीर, घुशी, वटवाघूळ यांनी घेतली आहे. पूर्वीसारखेच गतवैभव मला केव्हा प्राप्त होईल याची मी आतुरतेने वाट पाहात आहे.”

पडक्या मंदिराचे विदारक चित्र पाहून आणि ऐकून माझे मन मात्र खिन्न झाले.

पुढे वाचा:

Leave a Reply