Set 1: सिनेमा – चित्रपट मराठी निबंध – Chitrapat Movie Essay in Marathi

सिनेमा हा प्रकार सर्वच लहानथोरांना आवडतो. अगदी गुंगवून ठेवतो. एवढे ह्या सिनेमात असते तरी काय?

मला लहान मुलांचे सिनेमे आवडतात. अमिताभ बच्चनचा सिनेमा मी खूप आवडीने पाहाते. मला सिनेमातली गाणीही खूप आवडतात. हिंदी चित्रपटात कसे सगळे छान छान असते. त्यातली नायिका खूप देखणी असते, नायक एकदम शूरवीर असतो. त्याला कुणीही कितीही मारले तरी लागत नाही. मला तर एवढेसे कुणी मारले तरी रडायला येते. त्यामुळे सिनेमा म्हणजे सगळा खोटेपणा आहे हे अगदी स्पष्टच आहे.

हा सिनेमा खूप पूर्वी फक्त काळा आणि पांढरा ह्याच रंगात दिसायचा. तो सुरूवातीला मुकाही होता. हळूहळू सिनेमा बोलू लागला. मग त्यात रंग आले. आता तर चित्रपटाचे तंत्र पुष्कळ पुढे गेले आहे.

पहिला बोलपट श्रेष्ठ मराठी दिग्दर्शक दादासाहेब फाळके ह्यांनी काढला, त्याचे नाव होते’ हरीश्चंद्र तारामती’. सिनेमा चांगला की वाईट होणार ते बरेचदा त्याच्या दिग्दर्शकावर अवलंबून असते. भारतात व्ही शांताराम, सत्यजीत राय, बिमल राय, गुलजार असे , मोठेमोठे दिग्दर्शक होऊन गेले. ह्या सर्वांनी सिनेमाला कलात्मक उंची दिली.

Set 2: सिनेमा – चित्रपट मराठी निबंध – Chitrapat Movie Essay in Marathi

सिनेमा आपणा सर्वांना खूपच आवडतो. विशेषतः आमच्या एवढ्या लहान मुलांना सिनेमा पाहायला चित्रपटगृहात जायला मिळाले तर खूपच आनंद होतो.

एकुणच आजचे जीवन खूप धावपळीचे बनले आहे. वेगवेगळ्या ताणांमुळे शरीराला आणि मनाला खूपच थकवा येतो. अशा वेळेस काम संपल्यावर त्या थकव्यापासून दूर जाण्यासाठी कसल्यातरी मनोरंजनाची माणसाला गरज असते. हे मनोरंजन माणसाला देण्याचे काम सिनेमा करतो. परंतु सिनेमाचे काम तेवढेच नाही. चांगला सिनेमा माणसाला धरून ठेवतो, विचार करायला लावतो, अस्वस्थही करतो. मोठमोठ्या दिग्दर्शकांनी सिनेमा ह्या माध्यमातून आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडवले आहे.

थॉमस अल्वा एडिसन ह्याने अमेरिकेत १८९४ साली किनेटोस्कोपचा म्हणजेच हलत्या चित्रांचा शोध लावला. त्यातूनच पुढे सिनेमाचे तंत्र विकसित झाले आणि मूकपट बनू लागले. चार्ली चॅपलीनचे काही मूकपट अजरामर आहेत. त्यानंतर मूकपटांतील पात्रांना आवाज देण्याचे काम डाडस्टे ह्या शास्त्रज्ञाने केले.

आपल्या देशात दादासाहेब फाळके ह्यांनी चित्रपटउद्योगाची सर्वप्रथम पायाभरणी केली. त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट १९१३ साली भारतात बनवला. त्यानंतर १९३१ साली पहिला बोलका चित्रपट ‘ आलम आरा’ मुंबईत तयार झाला. आज हॉलिवुडनंतर दुस-या क्रमांकावर बॉलिवुड म्हणजे मुंबईचीच चित्रनगरी आहे. खूप पूर्वी फक्त कृष्णधवल सिनेमेच बनत होते. आता मात्र रंगीत सिनेमे बनतात. फोटोग्राफीच्या, संकलनाच्या आणि ध्वनीसंयोजनाच्या तंत्रातही खूपच सुधारणा घडून आलेल्या आहेत.

अगदी सुरूवातीला जादूचे आणि धार्मिक चित्रपट तेवढे बनत होते. आता मात्र सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, भयपट असे सगळ्या त-हेचे सिनेमे जगभर बनत असतात. चित्रपट आपल्याला माहिती देतो, प्रगल्भ करतो तसेच चित्रपटाचे दुष्परिणामही खूप आहेत. सतत चित्रपट पाहिल्याने नजरेवर ताण येतो. डोळे खराब होऊन थकवा जाणवू लागतो.

काही जण एकच चित्रपट अनेकदा पाहून वेळ आणि पैसा दोन्हींचे नुकसान घडवून आणतात. आजकालच्या काही सिनेमांमध्ये अंगप्रदर्शन, हिंसा, बलात्कार, लूटमार, खून ह्यांचे भडक आणि अतिरेकी चित्रीकरण असते. अशा चित्रपटांचा तरूणांवर विशेषतः लहान मुलांवर खूपच वाईट परिणाम होतो. मुले तर सिनेमातून चांगल्यापेक्षा वाईटच गोष्टी अधिक उचलतात. ती सिनेमातील नटनट्यांचे अंधानुकरण करतात. म्हणून चित्रपटनिर्मात्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे. सरकारनेही चांगल्या चित्रपटांना उत्तेजन दिले पाहिजे. सुट्यांच्या दिवशी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या सिनेमांचे प्रसारण केले पाहिजे.

असा आहे चित्रपटांचा हा नवा जमाना.

Set 3: सिनेमा – चलचित्रपट चित्रपट मराठी निबंध – Chitrapat Movie Essay in Marathi

सध्याच्या काळात जीवन फार व्यस्त बनले आहे. त्यामुळे आपले शरीर व मन फार थकते. तन आणि मनाचा एकमेकांशी फार घनिष्ठ संबंध आहे. मन आनंदित असेल तर काम करण्याचा उत्साह येतो. काम संपल्यावर मनोरंजनाची इच्छा होते. आपणास आनंद मिळावा म्हणून विज्ञानाने अनेक साधने शोधली आहेत. त्यापैकी एक आहे चलचित्रपट,

अमेरिकेतील शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन याने १८९४ मध्ये चलचित्रपटाचा शोध लावला. त्या काळात मूक चित्रपट बनत असत. काही वर्षांनी मूक चित्रपटांतील पात्रांना आवाज देण्याचे काम डाडस्टे या शास्त्रज्ञाने केले. अमेरिकामार्गे इंग्लंडहून चलचित्रपट भारतात आला, तो आणणारे होते भारतीय निर्माते दादासाहेब फाळके. त्यांनी पहिला भारतीय मूक चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ बनविला. १९३१ मध्ये पहिला बोलका चित्रपट ‘आलमआरा’ मुंबईत तयार झाला. आज हॉलिवूड नंतर चित्रपट निर्मितीत भारताचाच क्रमांक लागतो. पूर्वी काळया-पांढऱ्या रंगात चित्रपट बनत होते आता रंगीत चित्रपट बनतात. सुरवातीला धार्मिक आणि पौराणिक चित्रपट बनत असत. हळूहळू सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे चित्रण चित्रपटांत होऊ लागले.

चित्रपट हे लोक शिक्षणाचे एक साधन आहे. ऐकणे आणि वाचणे यापेक्षा एखादा विषय पाहून समजणे सोपे असते. ऐतिहासिक, भौगोलिक, प्राकृतिक, वैज्ञानिक, कृषिसंबंधी इ० अनेक विषयांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली जाते. लघु चित्रपटांद्वारे नैतिक शिक्षण दिले जाते. सरकार आपल्या नव्या योजनांचा प्रचार तसेच जनजागृतीचे कार्यक्रम चित्रपटांच्या माध्यमातून करते. आज चित्रपटाचे माध्यम सशक्त व प्रगत बनले आहे.

चित्रपट ज्याप्रमाणे आपले जीवन सुधारतो त्याचप्रमाणे आपले पतनही घडवून आणतो. सतत चित्रपट पाहिल्यामुळे डोळे खराब होतात व थकवा येतो. अनेक जण एकच चित्रपट अनेक वेळा पाहतात. त्यामुळे पैसा आणि वेळेचे नुकसान होते. आज चित्रपटांत अंगप्रदर्शन, हिंसा, बलात्कार, लूटमार, खून यांचे दृश्ये भडक चित्रण असते. अशा चित्रपटांचा तरुणांवर, विशेषत: लहान मुलांवर वाईट परिणाम होतो. मुले चित्रपटाद्वारे चांगल्या गोष्टी कमी व वाईट गोष्टीच जास्त शिकतात. नटनट्यांचे अनुकरण करतात.

चित्रपटाचा समाजावर फार खोलवर परिणाम होतो. निर्माते आणि सरकार यांनी ही गोष्ट खास लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे चित्रपट बनवितांना समाजाचा विचार करायला हवा व जबाबदारीने काम करायला हवे. चांगल्या चित्रपटांना सरकारने उत्तेजन दिले पाहिजे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट सुटीच्या दिवशी दाखविले पाहिजेत. चित्रपटाच्या तंत्रात अनेक बदल व प्रगती झाली आहे. त्यामुळे तो अधिक प्रेक्षणीय, श्रवणीय झाला आहे.

मी पाहिलेला चित्रपट | माझा आवडता चित्रपट मराठी निबंध | Mi pahilela chitrapat marathi nibandh

पुढे वाचा:

Leave a Reply