सिंहगड बोलू लागला तर निबंध मराठी – Sinhagad Bolu Lagla Tar Marathi Nibandh
आमच्याकडे सुट्टीत पाहुणे आले होते. त्यांना घेऊन आम्ही सिंहगडावर गेलो होतो. आम्ही गड चढून वर गेलो. वर गेल्यावर थकल्यामुळे एका दगडावर टेकले आणि दृष्टी दिंडी दरवाजाकडे गेली. मनात आले हा गड बोलू लागला तर?
…तर हा सिंहगड तानाजी मालुसऱ्यांच्या पराक्रमाची कथा सांगेल. शत्रूच्या ताब्यात असलेला सिंहगड तानाजीने प्राणांची बाजी लावून घेतला, म्हणून तर तो ‘सिंहगड’ झाला. स्वातंत्र्याचा संघर्ष या गडाने अनुभवलेला आहे. प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा सहवास त्याला लाभला आहे. महाराष्ट्राच्या त्या ‘केसरी’ च्या मनाची धडधड त्याने ऐकली आहे. त्याची कथा तो आपल्याला नक्की ऐकवेल!
आज सिंहगडावर दूरदर्शनचे मनोरे आहेत. काळाप्रमाणे हा गड आपल्या कार्यात बदल करत आहे. पण येथे येणारे पर्यटक या भूमीचा पराक्रम, पावित्र्य जाणतात का? एकदा महाराष्ट्रात नेताजी सुभाषचंद्र आले होते. ते या गडावरील एका कातळावर बसले होते. शौर्य, स्वाभिमान व स्वदेश प्रेम यांची प्रेरणा त्यांना येथे मिळाली होती. खरेच, हा सिंहगड आपल्याला या सर्व हकिकती सांगेल! त्यासाठी तरी सिंहगड बोलू लागला पाहिजे.
पुढे वाचा:
- सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
- साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी निबंध मराठी
- साथीचे आजार माहिती मराठी निबंध
- साक्षरतेची मोहीम निबंध मराठी
- साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी
- सहशिक्षण निबंध मराठी
- सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध
- विदुषक मराठी निबंध
- मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी
- डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी
- समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध
- समता हवी निबंध मराठी