मी सुई बोलतेय – सुईचे आत्मवृत्त – Mi Sui Boltey- Suiche Aatmavrutta – Autobiography Of The Needle Essay in Marathi.
सकाळी उठल्या उठल्या गणवेशाची तुटलेली बटणे लावण्यासाठी सुई शोधत होते. पण ती सापडता सापडेना. शेवटी आईनेच बघून दिली. बटणे लावून झाल्यावर ती जमिनीवर तशीच पडून राहिली. संध्याकाळी शाळेतून घरी येताच ती खसकन् माझ्या पायात घुसली. मी आई गं !’ असे ओरडले. इतक्यात..
“बाळ स्वाती, तुला खूप लागलं तर नाही ना ! मला निष्काळजीपणे वापरल्याबद्दल ही तुला झालेली छोटीशी शिक्षा” प्रत्यक्ष सुई माझ्याशी बोलत ‘ होती. ती पुढे बोलू लागली
“बाळ तुला कदाचित माहीत असेल, माझा जन्म लोहकुळात झाला. “बाळ जन्माअगोदर पृथ्वीच्या पोटात मी निवांत होते; पण माणसानं मला पृथ्वीच्या पोटातून ओढून काढलं व भट्टीत घातलं, तेव्हा माझ्या अंगाचे पाणी पाणी झालं; त्यामुळेच तर माझे शरीर पूर्वीपेक्षा बळकट झाले आहे. लंडनजवळ शेफील्ड नावाचे शहर आहे, तेथे माझा प्रथम जन्म झाला. सुरुवातीला मी खूपच जाडजूड होते. नंतर माझे अंग तापवून एका बारीक भोकातून मला ओढून काढून तारेसारखे बारीक केले. ,
आज तुझ्याकडे मी आहे, ते रुप मला मिळण्यासाठी मला खूप कष्ट सोसावे लागले. माझ्यावर अनेक प्रक्रिया झाल्या. मी एक साधी वस्तू आहे म्हणून माझी कुणी हेटाळणी केली, कुठेही पडू दिलं तर ते मला आवडत नाही. मला जेवढे काम, तेवढी मी झकपक राहते. अन्यथा मी तांबरते. माझा रंग बदलतो. इथून पुढे तरी मला नीट वापरत जा आणि माझ्यापासून जपून राहत जा. .
पुढे वाचा:
- सिनेमा – चित्रपट मराठी निबंध
- मी सिंहगड बोलतो आहे
- सिंहगड बोलू लागला तर निबंध मराठी
- सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
- साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी निबंध मराठी
- साथीचे आजार माहिती मराठी निबंध
- साक्षरतेची मोहीम निबंध मराठी
- साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी
- सहशिक्षण निबंध मराठी
- सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध
- विदुषक मराठी निबंध
- मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी