सुट्टी मराठी निबंध मराठी – Essay On Holiday in Marathi

सुट्टी कुणाला आवडत नाही? सुट्टी सर्वांना आवडते. आठवड्याचे सहा दिवस शाळेत गेल्यावर मिळणारी रविवारची सुट्टी मला तर खूप आवडते.

त्या दिवशी लौकर उठावे लागत नाही. सकाळी आरामात साडेआठला उठल्यावर आई मला गरमगरम खायला देते. त्या दिवशी आई आणि बाबा दोघेही घरीच असतात म्हणून मला खूप आनंद होतो. दुपारी आम्ही सावकाश गप्पा करीत जेवतो. आई त्या दिवशी खास मेनू बनवते. कधीकधी रविवारी मामामामी आमच्याकडे येतात तर कधीकधी आम्ही त्यांच्याकडे जातो.

दुपारच्या जेवणानंतर आईबाबा थोडेसे झोपतात तेव्हा मी दंगा करू नये असे त्यांना वाटते. त्यांना झोप मिळावी म्हणून मी पुस्तक वाचतो किंवा कार्टून पाहातो.खूप गृहपाठ दिला असेल तर तो रविवारी दुपारीच करून टाकतो. सुट्टीची संध्याकाळ मला आवडते. कारण सोसायटीच्या मैदानात संध्याकाळी चार वाजताच आम्ही मुले जमतो.

तिथे आम्ही लगोरी, डबा ऐसपैस किंवा क्रिकेट खेळतो. दोनतीन तास खेळून अंधार पडल्यावर घरी येतो तेव्हा सुट्टी संपली म्हणून वाईट वाटत असते परंतु त्याच वेळी पुढील सहा दिवसांचा उत्साह मी मनात भरून घेतलेला असतो.

पुढे वाचा:

Leave a Reply