सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे – Samarthya Ahe Chalvaliche Jo Jo Karil Tayache
समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमान मंदिरे उभारली, त्या माध्यमातून लोकांना संघटित केले आणि चळवळीची शक्ती मोठी असते हे लोकांना पटवून दिले. त्यांनी संघटना करून अन्यायाविरुद्ध लढण्याची स्फूर्ती दिली.
समर्थ रामदासांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्ण काळात अनेक संघटना तयार झाल्या. संघटित लढ्याने यशप्राप्ती होते, हे लोकांना पटू लागले. आपल्या देशाला संघटित प्रयत्नांमुळेच स्वातंत्र्य मिळाले. समाजात वळवळ करणाऱ्या चळवळी खूप आहेत. स्वार्थातून निर्माण झालेल्या संघटना समाजहिताचे कार्य करू शकत नाहीत. म्हणूनच चळवळ करा, वळवळ करू नका. चळवळीत सामर्थ्य असते.
दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळ केली, मोठा लढा उभारला आणि पिढ्यान् पिढ्या अस्पृश्याच्या खाईत पडलेल्या दलित समाजाला अंधारातून बाहेर काढले. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी भारतात अनेक संघटना उभारल्या. सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेली आझाद हिंद सेनेमार्फत चळवळ, क्रांतिकारी लोकांनी उभारलेली चळवळ, गांधीजींनी उभारलेली अहिंसावादी चळवळ यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले.
आजही समाजात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अनेक संघटना स्थापन झालेल्या आहेत.
पुढे वाचा:
- साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी निबंध मराठी
- साथीचे आजार माहिती मराठी निबंध
- साक्षरतेची मोहीम निबंध मराठी
- साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी
- सहशिक्षण निबंध मराठी
- सहल जिम कॉर्बेट अभयारण्याची मराठी निबंध
- विदुषक मराठी निबंध
- मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध
- सरावाचे महत्त्व निबंध मराठी
- डॉक्टर सी व्ही रामन निबंध मराठी
- समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध
- समता हवी निबंध मराठी
- सत्संगती मराठी निबंध