सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो – Susangati Sada Ghado Essay in Marathi

सुप्रसिद्ध कवी मोरोपंत संगीताचे महत्त्व सांगताना म्हणतात, माणसाला चांगली संगत लाभली आणि त्याच्या कानावर सुसंस्कारित असे चार शब्द पडले तर त्याची आदर्श व्यक्ती म्हणून जडण-घडण व्हायला नक्कीच उपयोग होईल.

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा ! त्याला आकार द्यावा तसा तो घडत असतो. हाच गोळा मोठा झाल्यावर त्याची ओळख त्याच्या भोवताली असणाऱ्या, त्याच्या संगतीत असणाऱ्या मित्रांवरून होत असते. म्हणूनच कविवर्य मोरोपंत म्हणतात, माणसाला नेहमी चांगली संगत घडायला हवी, त्याच्या कानी चांगल्या गोष्टी पडायला हव्या, ह्याशिवाय त्याच्या मनातील दुष्ट विचार झडणार नाही.

सुसंगतीमुळे अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात महान बनल्या आहेत. ए. पी. जे. अब्दुल कलाम आपल्या श्रेष्ठत्वाचे श्रेय आईवडील आणि शेजारी राहत असलेले सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबीय यांना देतात. पंडिताच्या घरी राहणारा पोपट सुवचने गातो, तर दुष्ट दुर्जनांच्या घरी राहणारा पोपट अर्वाच्य बोलतो. अढीतील कुजका आंबा सर्व अढीच नासवतो. म्हणूनच माणसाने नेहमी सज्जनांच्या संगतीत राहिले पाहिजे. ‘चंद्र आणि चांदण्यांपेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो’ हे महाकवी कालिदासाचे वचन सर्वांनी ध्यानात ठेवायला हवे.

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो – Susangati Sada Ghado Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply